Cloudy Weather : ढगाळ वातावरणाचा फटका

Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर बुरशी रोगाची शक्यता आहे. तर पावसामुळे मोहोर गळून जाण्याची भीती आंबा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
Mango Blossom
Mango BlossomAgrowon
Published on
Updated on

Raigad News : दोन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंब्यावर बुरशी रोगाची शक्यता आहे. तर पावसामुळे मोहोर गळून जाण्याची भीती आंबा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीचे क्षेत्र १६, ९७४ हेक्टर असून मुरूडमध्ये १,५९० हेक्टरवर हापूसची लागवड केली जाते. सरकारकडून तीन वर्षांत हेक्टरी ४६ ते ४७ हजार अनुदान देण्यात आले असले तरी लागवडीखालील क्षेत्रात फारशी वाढ झालेली दिसत नाही. कोकणात बहुतांश आंबा लागवड डोंगर उताराच्या व वरकस पडीक जमिनीवर केली जाते. थोडी आम्लयुक्त जमीन आंबा वाढीसाठी पोषक ठरते.

Mango Blossom
Cloudy Weather : ढगाळ हवामान, पावसाने शेतकरी चिंताग्रस्त

गतवर्षी सुरुवातीला पोषक वातावरणामुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. मात्र यंदा वादळी पाऊस व तापमानात वारंवार होणारे बदल, धुके, मध्येच थंडी पडत असल्‍याने मोहोर गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्‍यामुळे फळधारणा ५० ते ६० टक्के कमी झाली आहे.

पुढील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहिल्‍यास फळगळत्‍ाी सुरू होईल. तसेच बुरशीजन्य रोगामुळे फळाचा दर्जाही खालावण्याची शक्‍यता आंबा उत्पादकांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच मोहोर गळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नवनवीन वाणाची लागवड

तालुक्यातील आगरदांडा, सावली, भोईघर, बोर्ली -मांडला, साळाव, वळके, शिरगाव या परिसरात कृषी विभागाच्या मदतीने यंदा नवनवीन आंबा बागांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. केवळ पारंपरिक हापूस वाण न निवडता त्यामध्ये किमान १० टक्के लागवड रत्ना, सिंधू, पायरी या वाणाच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे, मात्र सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाने आंबा उत्पादक धास्‍तावले आहेत.

Mango Blossom
Cloudy Weather : ढगाळ वातावरणाने चिंता

बागांच्या पुनरुज्जीवनाची गरज

जुन्या झाडांपासून उत्पन्न कमी येत असल्याने बागांचे पुनरुज्जीवन अर्थात छाटणी होणे गरजेचे आहे, मात्र जून २०२० च्या निसर्ग वादळात ५० वर्षांपेक्षा जुनी झाडे जमीनदोस्त झाल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला. आंब्याचे व्यापारी करारास मुकल्‍याने लाखोंची उलाढाल ठप्प झाल्‍याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

सद्य:स्थितीत आंबा पिकास मोहोर येण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी फळधारणाही झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे करपा आणि तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी औषध फवारणी करावी. तसेच फळधारणा झाल्यावर उपलब्धतेनुसार झाडांना पाणी द्यावे व बुंद्याभोवती आच्छादन करावे, जेणेकरून फळगळती कमी होईल.
मनीषा भुजबळ, कृषी अधिकारी, मुरूड
यंदा थंडीचे प्रमाण चांगले असल्याने आंबा मोहोरण्यासाठी अनुकूल वातावरण होते, मात्र सलग दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळण्याची भीती आहे. त्यातून अवकाळी पाऊस पडला तर उरलासुरला मोहोरही गळून पडल्‍यास मोठे नुकसान होईल.
मनोज कमाने, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com