Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : परभणी -हिंगोलीत आंबा, हळद उत्पादकांना फटका

परभणी - हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवार (ता.२१) पर्यंतच्या २४ तासांत ५७ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला.
Published on

Parbhani News परभणी - हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवार (ता.२१) पर्यंतच्या २४ तासांत ५७ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाल्याने आंबा उत्पादकांचे नुकसान (Crop Damage) झाले. वेचणी राहिलेला कापूस तसेच शेतात वाळवत ठेवलेली हळद भिजल्याने मालाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील ४० मंडलांत पाऊस झाला. परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा जोर होता. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १.२ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १७ मंडलांत पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage Subsidy : पीक नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित

या दोन जिल्ह्यात हळद काढणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शिजविलेली हळद शेतात वाळवत घातलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस येत असल्यामुळे हळद भिजून नुकसान झाले होते.

Crop Damage
Crop Damage In Nagar : नगरमध्ये गारपीट नुकसानीचा आकडा वाढतोय

सततच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फळगळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय मदत द्यावी, अशी मागणी पूर्णा तालुक्यातील माखणी येथील शेतकरी जनार्दन आवरगंड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.

परभणीमध्ये रुवारी (ता.२०) रात्री झालेल्या वादळी पावसामुळे माखणी (ता. पूर्णा) शिवारातील जनार्दन आवरगंड यांच्या आंब्याची फळगळ झाली. शुक्रवारी (ता.२१) नुकसानीची पाहणी महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com