Agrowon Anniversary 2024 : ‘ॲग्रोवन वर्धापन दिना’निमित्त पुण्यात हवामान बदल परिषद

Climate Change Conference : ‘सकाळ ॲग्रोवन’ येत्या शनिवारी (ता. २०) एकोणिसावा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने ‘हवामान बदल परिषद’ तसेच राज्यभर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
Agrowon Anniversary
Agrowon Anniversary Agrowon

Pune News : कृषिविषयक सहज, सोपी आणि उपयुक्त माहितीचा नजराणा रोज पानापानांमधून देत राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकणारा ‘सकाळ ॲग्रोवन’ येत्या शनिवारी (ता. २०) एकोणिसावा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने ‘हवामान बदल परिषद’ तसेच राज्यभर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १९ व २० एप्रिलला दोन विशेषांकही प्रकाशित होत आहेत.

वर्धापन दिनानिमित्ताने ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रंजन केळकर व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात ‘हवामान बदल परिषद’ होत आहे. विविध जलतज्ज्ञ, जलसाक्षरतेमधील कार्यकर्ते, अभ्यासक, हवामान शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, निविष्ठा उद्योगातील मान्यवर, कृषी व कृषी संलग्न खात्यांमधील अधिकारी, विविध संस्थांमधील पदाधिकारी या परिषदेत सहभागी होत आहेत.

Agrowon Anniversary
World Climate Day : हवामान बदलाबाबत जागरूक राहा

फक्त निमंत्रितांसाठी असलेल्या या परिषदेत हवामान बदलाचे वर्तमान व भवितव्य तसेच त्याचे शेती आणि पशूंवरील परिणाम, हवामान अनुकूल शेतीचे प्रारुप आदी विषयांवर मंथन होईल. वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुष्काळ, जलसाक्षरता, हवामान बदल या विषयांकडे लक्ष वेधणारे कार्यक्रम राज्यभर घेतले जात आहेत.

गेल्या वर्षीपासून राज्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेती व्यवस्था अडचणीत आहे. या व्यवस्थेला कसे सावरावे याचे मार्गदर्शन विविध चर्चासत्रांमधून केले जाणार आहे. अभ्यासक व तज्ज्ञांकडून या चर्चासत्रांद्वारे दुष्काळी स्थितीमधील शेती, फलोत्पादन, ऊस व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले जाईल.

Agrowon Anniversary
Climate Change : करतोय कोण अन् भोगतोय कोण ? - महारुद्र

देशातील एकमेव कृषी दैनिक अशी ख्याती मिळवलेल्या ‘ॲग्रोवन’ने राज्याच्या कुंठित शेतीला नवी दिशा दिली. या दैनिकामुळेच जिद्दी शेतकऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या यशोगाथा राज्यभर विस्तारल्या. याशिवाय चर्चासत्रे, कृषी प्रदर्शने यामधून शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतीचे धडे दिले. सतत १९ वर्षे कृषिविषयक भरभरून माहिती देणाऱ्या ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणले. शेतकऱ्यांचे हे लाडके वृत्तपत्र आता द्वीदशकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

हवामान बदलाविषयी दोन विशेष पुरवण्या

‘ॲग्रोवन’चा वर्धापन दिन म्हटला, की विशेष पुरवण्यांची मेजवानी ठरलेली. यंदा ‘हवामान बदल : आव्हान’ आणि ‘हवामान बदल : उपाय’ अशा दोन विशेष पुरवण्या वाचकांच्या भेटीला येत आहेत. यात मान्यवर लेखकांनी या विषयावर मांडलेल्या समस्या आणि उपायांचा सखोल आढावा वाचायला मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com