जागतिक हवामान दिन विशेषSustainableFarming: वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान आणि तीव्र होत चाललेले हवामान बदल हे शेती व मानवी जीवनासमोरील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन हवामान सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत उपाययोजनांचा समन्वय साधClimate Changeणे ही काळाची अत्यावश्यक गरज ठरते..२३ मार्च हा ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हवामान हा घटक केवळ मानवी जीवनापुरता मर्यादित नसून तो प्राणी, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम करणारा आहे. सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, पर्जन्य या घटकांतील बदलामुळे हवामानात सातत्याने विविधता दिसून येते. मात्र गेल्या काही दशकांत मानवनिर्मित कारणांमुळे हवामानातील बदलांची गती वाढली आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड यांसारख्या वायूंचे प्रमाण वाढल्याने तापमानवाढ होत असून, त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहेत..Climate Change Impact: गव्हाला बसतोय हवामान बदलाचा फटका.सन २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या हवामान परिषदेत जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. मात्र सध्याची स्थिती पाहता हे उद्दिष्ट साध्य करणे अधिक कठीण होत चालले आहे.अलीकडील अहवालानुसार पृथ्वीचे सरासरी तापमान १.५ अंशांच्या पुढे गेले आहे. ही बाब भविष्यातील धोके अधिक गंभीर असल्याचे संकेत देते. याशिवाय, जंगलतोड ही आणखी एक गंभीर समस्या आहे. ॲमेझॉनसारख्या मोठ्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, त्याचा कार्बन संतुलनावर परिणाम होत आहे..हवामान बदल ही भविष्यातील नव्हे, तर वर्तमानातील समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासन, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे..Climate Change Impact: पुन्हा ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांना धसका.तापमानवाढ आणि त्याचे परिणामजागतिक तापमानवाढ ही आता केवळ वैज्ञानिक चर्चेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती प्रत्यक्षात जाणवणारी गंभीर समस्या बनली आहे. तापमानातील वाढीमुळे हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे आणि किनारपट्टी भागांना धोका निर्माण होत आहे. उत्तर ध्रुवातील बर्फ झपाट्याने कमी होत असून, त्याचा जागतिक हवामान पद्धतीवर परिणाम होत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे आणि महापुरांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. याशिवाय, वाढते तापमान आणि दूषित वातावरण यामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. हवा प्रदूषणामुळे श्वसनविकार आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे..शेती क्षेत्रावरील परिणामहवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. पर्जन्यमानातील अनिश्चितता, तापमानातील बदल आणि कीड-रोगांच्या वाढीमुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेती अधिक जोखमीची बनत चालली आहे.जलसंकटाची भीषणताहवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम जलस्रोतांवर होत आहे. जगातील बहुसंख्या लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. वाढती लोकसंख्या, पाण्याचा अयोग्य वापर आणि हवामानातील बदल यामुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास स्थलांतराची शक्यता निर्माण होते. ग्रामीण भागात तर ही समस्या अधिक गंभीर आहे. शुद्ध पाण्याअभावी आरोग्य समस्या आणि शेती उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम होत आहे..Climate Change Impact: रायगड जिल्ह्याच्या वातावरणीय बदलाचा रोडमॅप तयार.वाढते प्रदूषणऔद्योगिकीकरण आणि वाढती वाहतूक ही हवामान बदलामागील प्रमुख कारणे ठरत आहेत. जगभरात अब्जावधी वाहने वापरात असून, पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत आहे.तसेच रेल्वे आणि विमान वाहतूकही प्रदूषणात भर घालत आहे. विमानांमधून उत्सर्जित होणारे वायू वातावरणावर दीर्घकालीन परिणाम करतात. ही परिस्थिती नियंत्रणात न आणल्यास भविष्यात हवामान बदलाचे दुष्परिणाम अधिक तीव्र होतील..हवामान सेवा आणि तंत्रज्ञानाची भूमिकाहवामान अंदाज व माहिती देणाऱ्या यंत्रणांची भूमिका आज अधिक महत्त्वाची बनली आहे. डॉप्लर रडार, उपग्रह प्रणाली आणि स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे अचूक अंदाज देणे शक्य होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर सूचना मिळून पिकांचे नुकसान टाळता येते.भारतात हवामान विभागाने विविध भागांत डॉप्लर रडार, स्वयंचलित हवामान केंद्रे आणि आधुनिक उपकरणांचा वापर वाढविला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर अचूक हवामान माहिती उपलब्ध होत असून, कृषी नियोजन अधिक प्रभावी बनत आहे..Climate Change: डोनाल्ड ट्रम्प आणि ग्रीनलँड .जगभरात सुमारे १९३ देशांमध्ये हवामान निरीक्षणाचे जाळे कार्यरत असून हजारो वेधशाळांमधून दररोज हवामान घटकांची नोंद केली जाते. या माहितीच्या आधारे अल्पकालीन आणि दीर्घकालीन अंदाज तयार केले जातात. याशिवाय, सुमारे ३०० उपग्रहांद्वारे पृथ्वीच्या वातावरणाचे सतत निरीक्षण केले जाते. हे उपग्रह ढगांची हालचाल, पर्जन्य, तापमानातील बदल, चक्रीवादळांची निर्मिती यांचे अचूक निरीक्षण करून तात्काळ माहिती देतात. समुद्रातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर केला जातो. समुद्रातील तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग यांचा अभ्यास केल्याने चक्रीवादळांचा अंदाज अधिक अचूकपणे देता येतो..भारतातही हवामान निरीक्षणासाठी डॉप्लर या रडारच्या मदतीने पर्जन्यमान, ढगांची घनता आणि वादळांची दिशा यांची माहिती १० ते १५ किमी अंतरापर्यंत अचूक मिळते. त्यामुळे तातडीच्या इशाऱ्यांची प्रणाली अधिक सक्षम झाली आहे. हवामान सेवा केवळ अंदाज देण्यापुरती मर्यादित नसून ती आपत्ती व्यवस्थापनासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. अतिवृष्टी, चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा किंवा थंडीच्या लाटांबाबत आधीच सूचना दिल्यास मानवी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते..Climate Change Impact: हवामान बदलामुळे बागायतदार चिंताग्रस्त.शेती क्षेत्रात हवामान सेवांचा उपयोग अधिक प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांना पेरणी, खत व्यवस्थापन, फवारणी आणि काढणी यांसाठी हवामानानुसार सल्ला दिला जातो. त्यामुळे उत्पादनात स्थिरता राखण्यास मदत होते.अखिल जिओ साइन्सेससारख्या संस्थांनी स्थानिक पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारून डेटा संकलनाचे कार्य सुरू केले आहे. या उपक्रमांमुळे सूक्ष्म पातळीवर हवामान समजून घेणे शक्य होत असून, स्थानिक शेती व्यवस्थापनाला मोठी मदत होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान सेवा यांचा समन्वय साधल्यास हवामान बदलाच्या परिणामांना कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे या क्षेत्रात अधिक गुंतवणूक आणि विस्तार करणे ही काळाची गरज आहे..स्थानिक पातळीवर जनजागृती आणि कृती आवश्यकहवामान बदलावर नियंत्रणासाठी केवळ जागतिक धोरणे पुरेशी नाहीत, तर स्थानिक पातळीवरील जनजागृती आणि कृती अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक विविधीकरण आणि हवामानानुसार शेती पद्धती स्वीकारणे ही काळाची गरज आहे. तसेच ग्रामस्तरावर जलसंधारण आणि वृक्षारोपण उपक्रम राबवणे आवश्यक आहे..सध्याच्या परिस्थितीत हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत.नवीकरणीय उर्जेचा (सौर, वारा) वापर मोठ्या प्रमाणावर वाढवणे आवश्यक आहे.पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी करून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.वृक्षारोपण आणि जंगलांचे संवर्धन करणे.जलसंधारण, धरणे, तलाव आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करून पाणीसाठा वाढवणे.ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे.शेतकऱ्यांसाठी प्रभावी पीक विमा योजना आणि हवामान सल्ला सेवा अधिक सक्षम करणे.(लेखक ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ असून ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशियाचे सदस्य आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.