Wheat Cultivation : गहू लागवडीसाठी योग्य वाणाची निवड महत्त्वाची

Wheat Farming : गहू पिकाची पेरणी योग्य वेळी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल प्रमाणे उत्पादन कमी येते.
Wheat Farming
Wheat FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अविनाश गोसावी

Wheat Farming Management : गहू पिकाची पेरणी योग्य वेळी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल प्रमाणे उत्पादन कमी येते. लागवडीसाठी योग्य गुणवैशिष्ट्ये असलेल्या वाणाची निवड आवश्यक आहे.

गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान चांगले मानवते. थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादनात भर पडते आणि थंडीचा कालावधी कमी झाल्यास उत्पादनात घट येते. गहू लागवडीकरिता जिरायती, मर्यादित सिंचन, बागायती वेळेवर तसेच बागायती उशिरा पेरणी करताना योग्य वाणांची निवड महत्त्वाची ठरते.

जमीन

पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी जमीन लागवडीस योग्य असते.

पूर्वमशागत

जमिनीची २० ते २५ सेंमी खोल नांगरट करावी. हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत खत जमिनीत मिसळावे. दोन वेळा कुळवणी करावी.

पेरणी कालावधी

जिरायत गहू : १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर

मर्यादित सिंचन : २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर

बागायती वेळेवर : १ ते १५ नोव्हेंबर

बागायती उशिरा : १५ डिसेंबरपर्यंत

पेरणी १५ नोव्हेंबरनंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल प्रमाणे उत्पादन कमी येते.

Wheat Farming
Wheat Cultivation : जाणून घ्या खपली गहू लागवडीचे तंत्र

पेरणी पद्धत

पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोल करावी.

पेरणी अंतर : २० सेंमी

पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी.

जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

हेक्टरी बियाणे

जिरायत पेरणीसाठी ७५ ते १०० किलो

बागायती वेळेवर पेरणीसाठी १०० ते १२५ किलो

बागायती उशिरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो

वाण निवड

जिरायती : पंचवटी, शरद, एम. ए. सी. एस. ४०२८

मर्यादित सिंचन : नेत्रावती, फुले अनुपम, फुले सात्त्विक, एन. आय. ए. डब्ल्यू. ११४९, एम. ए. सी. एच. ४०५८

बागायती वेळेवर पेरणी : फुले समाधान, तपोवन, गोदावरी, त्र्यंबक, एमएसीएस ६१२२

बागायती उशिरा पेरणीसाठी : फुले समाधान, एनआयएडब्ल्यू ३४

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन (नत्र : स्फुरद : पालाश)

जिरायत : हेक्टरी ४०:२०:२० किलो

मर्यादित सिंचन : हेक्टरी ८०:४०ः४० किलो

बागायत वेळेवर पेरणी : हेक्टरी १२०: ६०: ४० किलो

बागायत उशिरा पेरणी : हेक्टरी ९०:६०:४० किलो

Wheat Farming
Wheat Varieties : गहू वाणांची गुणवैशिष्ट्ये

आंतरमशागत

बागायत वेळेवर आणि उशिरा पेरलेल्या गहू लागवडीमध्ये पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करावी.

पीक कांडी अवस्थेत आल्यानंतर तणांचा बंदोबस्त करता येत नाही. मजूर लावून तण नियंत्रण करताना पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

सिंचन व्यवस्थापन

भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाळ्या.

मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या.

हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या.

संवेदनशील अवस्था

पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये सिंचन करणे फायदेशीर ठरते.

एकच पाणी देणे शक्य असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे.

दोन पाणी देणे शक्य असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल, तर पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे ४२ ते ४५ दिवसांनी व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

बागायत उशिरा पेरणीसाठी

निफाड ३४ (एनआयएडब्ल्यू 34)

प्रसारणाचे वर्ष : १९९५

बागायतीत उशिरा पेरणीसाठी शिफारसीत सरबती वाण.

मध्यम टपोरे दाणे.

तांबेरा रोग, मावा किडीस प्रतिकारक.

चपातीसाठी उत्तम

पक्व होण्याचा कालावधी : १०० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ३५ ते ४० क्विंटल (उशिरा पेरणीखाली).

खपली वाण

डी. डी. के. १०२५

प्रसारण वर्ष : २००६

बागायती वेळेवर पेरणीसाठी

उत्कृष्ट दाणे

ब्रेड, बेकरी उत्पादने, पास्ता, चपातीसाठी उत्तम.

पक्वता कालावधी : १०५ ते ११० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ४५ ते ४६ क्विंटल

डी.डी. के. १०२९

प्रसारण वर्ष : २००७

बागायती वेळेवर पेरणीसाठी

रोग प्रतिकारक्षम, तापमानास सहनशील.

उत्कृष्ट दाणे

ब्रेड, बेकरी उत्पादने, पास्ता, चपातीसाठी उत्तम.

पक्वता कालावधी : १०० ते १०५ दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ४५ ते ४६ क्विंटल

एम. ए. सी. एस. २९७१

प्रसारण वर्ष : २००९

बागायती वेळेवर पेरणीसाठी

डीडीके १०२९ या वाणापेक्षा सरस वाण.

तांबेरा रोगास प्रतिकारक्षम

मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त वाण.

पक्वता कालावधी : १०६ दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ५० ते ५२ क्विंटल

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com