

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अविनाश गोसावी
Wheat Sowing : राज्यात गव्हाची जिरायती पेरणी ही ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. मर्यादित सिंचन उपलब्ध असल्यास २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत, तर बागायती वेळेवर पेरणी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत आणि बागायत उशिरात उशिरा १५ डिसेंबरपर्यंत पेरणी पूर्ण करावी.
पेरणीकरिता जिरायत, मर्यादित सिंचन, बागायती वेळेवर तसेच बागायती उशिरा पेरणी करताना योग्य वाणांची निवड महत्त्वाची ठरते. प्रत्येक वाणाची गुणवैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात, त्यामुळे योग्य वाणाची निवड आवश्यक आहे.
अ) जिरायती पेरणीसाठी :
पंचवटी (एनआयएडब्ल्यू १५)
जिरायती वेळेवर पेरणीसाठी शिफारस.
टपोरे, चमकदार व आकर्षक दाणे
प्रथिने प्रमाण : १२ टक्के
तांबेरा रोगास प्रतिकारक
शेवया, कुरडई व पास्ता निर्मितीसाठी उत्तम
पक्व होण्याचा कालावधी : १०५ दिवस
उत्पादन (हेक्टरी) : १२ ते १५ क्विंटल
एमएसीएस ४०२८
जिरायती पेरणी करिता शिफारशीत बन्सी वाण
पक्व होण्याचा कालावधी : १०० ते १०५ दिवस
तांबेरा रोगास प्रतिकारक
शेवया, कुरड्या, पास्ता निर्मितीसाठी उत्तम.
उत्पादन (हेक्टरी) : जिरायती १८ ते २० क्विंटल
ब) मर्यादित सिंचनासाठी :
नेत्रावती (एनआयएडब्ल्यू १४१५)
जिरायती किंवा एका ओलिताखाली लागवडीस शिफारस.
तांबेरा रोगास प्रतिकारक
चपातीसाठी उत्तम
पक्व होण्याचा कालावधी : जिरायतीत १०५ दिवस, तर एका ओलिताखाली ११० दिवस
उत्पादन (हेक्टरी) : जिरायती १८ ते २० क्विंटल, एका ओलिताखाली २७ ते ३० क्विंटल.
फुले सात्त्विक (एनआयएडब्ल्यू ३१७०)
वेळेवर नियंत्रित पाण्यावर पेरणीसाठी शिफारस
बिस्कीट निर्मितीकरिता सरबती वाण
पिकाचा कालवधी : ११५ ते १२० दिवस
तांबेरा रोग प्रतिकारक
उत्पादन हेक्टरी : ३५ ते ४० क्विंटल (एका ओलिताखाली)
फुले अनुपम (एनआयएडब्ल्यू ३६२४)
गव्हाचा सरबती वाण
नियंत्रित पाण्यावर पेरणीसाठी शिफारस
एका ओलिताखाली, वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत
चपातीसाठी उत्तम वाण.
आकर्षक टपोरे दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक
पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता
पीक कालावधी : १०५ ते ११० दिवस
उत्पादन (हेक्टरी) : ३० ते ३५ क्विंटल (एका ओलिताखाली)
बागायती वेळेवर पेरणीसाठी :
त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू ३०१)
महाराष्ट्रात वेळेवर बागायती पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण
मध्यम टपोरे दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक
चपातीसाठी उत्तम
पक्व होण्याचा कालावधी : ११५ दिवस
उत्पादन (हेक्टरी) : ४० ते ४५ क्विंटल
फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४)
बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी एकमेव शिफारशीत सरबती वाण
तांबेरा रोग तसेच मावा किडीस प्रतिकारक्षम.
टपोरे व आकर्षक दाणे,
चपातीची प्रत उत्कृष्ठ व प्रचलित वाणांपेक्षा सरस
पक्व होण्याचा कालावधी : बागायतीत वेळेवर पेरणीखाली ११५ दिवस, तर उशिरा पेरणी ११० दिवस.
उत्पादन (हेक्टरी) : बागायती वेळेवर ४५ ते ५० क्विंटल, बागायती उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ क्विंटल
तपोवन (एनआयएडब्ल्यू ९१७)
बागायती वेळेवर पेरणीस शिफारशीत सरबती वाण
मध्यम टपोरे दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक
चपातीसाठी उत्तम
पक्व होण्याचा कालावधी : ११५ दिवस
उत्पादन (हेक्टरी) : ४५ ते ५० क्विंटल
गोदावरी (एनआयडीडब्ल्यू २९५)
बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारस
टपोरे, चमकदार व आकर्षक दाणे
तांबेरा रोगास प्रतिकारक
शेवया, कुरड्या व पास्ता निर्मितीसाठी उत्तम.
पक्व होण्याचा कालावधी : ११० ते ११५ दिवस
उत्पादन (हेक्टरी) : ४५ ते ५० क्विंटल
- डॉ. आदिनाथ ताकटे ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.