Chief Minister Eknath Shinde : जरांगेंचा इशारा, शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

Birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj : आज महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. यानिमित्ताने शिवनेरीवर आयोजित विशेष कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath ShindeAgrowon

Pune News : आज सोमवार (१९ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून किल्ले शिवनेरीसह राज्यभर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणा वेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या. यावेळी किल्ले शिवनेरीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यादरम्यान मरोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला विशेष अधिवेशनावरून इशारा दिला आहे.

एक मराठा लाख मराठा

शिवजयंतीनिमित्त राज्यभरात आज मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. या दिनानिमित्त शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले भाषण केले. यादरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या .

Chief Minister Eknath Shinde
Manoj Jarange Patil : पोटदुखीने जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणावर ठाम

यावेळी शिंदे यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची तयारी सरकारने केली आहे. उद्या हे अधिवेशन बोलावलं आहे. तर मराठा आरक्षणासाठी ओबीस तसेच इतर कोणत्याही समाजाला धक्का लावला जाणार नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

Chief Minister Eknath Shinde
Manoj Jarange Patil Hunger Strike : उपचार घेणार की नाही, भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे जरांगे यांना निर्देश

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन

दरम्यान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी शिवरायांच्या चरणी हात लावला आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले आहे. याच्याआधी त्यांनी सरकारला इशारा दिला होता. त्यांनी, सरकार २० तारखेला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. पण सरकारकडून अजूनही सगेसोयऱ्यांवरून कोणतेही स्पष्टता नाही. त्यामुळे सरकारने फक्त कायदा करून थांबू नये. सगेसोयरे कायद्याबाबत जोपर्यंत सरकार भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा दिला आहे.

दांडपट्टा राज्यशस्त्र

आज शिवजयंतीच्या औचित्यावर कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा वाघ नख्यांवर वक्तव्य केले. त्यांनी वाघ नख भारतात आणणार असल्याचे सांगितले आहे. तर राज्य शासनाकडून दांडपट्टा या शिवकालिन शस्त्राची 'राज्यशस्त्र' म्हणून घोषणा केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com