Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

forest fire in Uttarakhand's Nainital : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हल्द्वानी येथे पोहोचून नैनितालच्या जंगलातील आगीबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश
Published on
Updated on

Pune News : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील जंगलात लागलेल्या आगीला ५० तासांहून अधिक काळ झाला आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभाग, अग्निशमन दल, पोलीस, लष्कर आणि हवाई दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा आगीवर केला जात आहे. तरिही या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात प्रशासनास यश आलेले नाही. यादरम्यान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नैनिताल जंगलाचा आग लागलेल्या भागाचे हवाई सर्वेक्षण केले. यानंतर हल्द्वानी येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री धामी यांनी दिले आहेत. या बैठकीला कुमाऊँचे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हल्द्वानी येथे कुमाऊं वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर मुख्यमंत्री धामी म्हणाले, जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. या आगीमुळे शेकडो हेक्टर जंगल नष्ट झाले असून वन्यजीव धोक्यात आले आहेत. यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जंगलातील आग अटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेची मदत घेण्यात आली आहे. तरिही वनविभागासह इतर विभागांनीही सतर्क राहावे. तर जंगलातील आग रोखण्यासाठी जनतेने देखील सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री धामी केले आहे.

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश
Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून नैनी आणि भीमताल तलावातून पाण्याची उचल केली जात आहे. एका वेळी ५ हजार लिटर पाण्याची उचल केली जात आहे. यामुळे सध्या नैनी तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे येथील नौकाविहार तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

यावरून मुख्यमंत्री धामी यांनी, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत जलसंस्थानच्या अधिकाऱ्यांनाही सूचनाही दिल्या आहेत. तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे असे म्हटले आहे. यावेळी धामी यांनी, वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जंगलात आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहे. यावरून त्यांनी, जंगलात आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही म्हटले आहे.

आगीत ७०८ हेक्टर जंगल खाक

उत्तराखंडमधील जंगलात आगीच्या घटना या वाढतच आहेत. ही एक समस्या बनली असून यामुळे शेकडो हेक्टर वनांसह वन्यजीव संकटात आले आहे. या आगीमुळे राज्यात ७०८ हेक्टर वनजमीन नष्ट झाली आहे.

उत्तराखंडमध्ये ५८४ गुन्हे दाखल

उत्तराखंडमधील जंगलात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुन्हेही दाखल केले जात आहेत. मात्र तपासाचं घोडे कुठे आडते याचा काही शोध लागत नाही. आतापर्यंत उत्तराखंडमध्ये ५८४ गुन्हे दाखल झाले असून सर्वात जास्त गुन्हे कुमाऊंमध्ये दाखल आहेत. येथे ३२२ गुन्हे दाखल असून यापाठोपाठ गढवालमध्ये २११ आणि ५१ गुन्हे प्रशासकीय वनक्षेत्रात नोंदवली गेली आहेत.

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश
Forest Fire : वणवा लावणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा

'तिघांवर गुन्हा दाखल'

शनिवारी नैनिताल येथील आगीच्या प्रकरणात वनविभागाने कडक कारवाई केली आहे. येथे तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर नैनिताल आणि आजूबाजूच्या परिसरात लागलेल्या आगीत १०० हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. यावरून मुख्यमंत्री धामी हे जंगलातील आगीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न

दरम्यान गढवाल विभागातील टिहरी, पौरी, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यातील जंगले अद्याप धुमसत आहेत. येथील जंगलात बहुतांशी पाइनची झाडे असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. वन कर्मचाऱ्यांकडून एका ठिकाणी आग विझवली तर ती दुसऱ्या ठिकाणी भडकत असल्याचे सध्याची स्थिती आहे. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com