Mahtari Vandana Yojana : महिलांना दरमहा मिळणार १ हजार रुपये ; मध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात योजना सुरू

Women Empowerment : मध्य प्रदेशपाठोपाठ आता छत्तीसगड सरकारसुध्दा राज्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येक १ हजार रुपये देणार आहे.
Mahtari Vandana Yojana
Mahtari Vandana YojanaAgrowon

Pune News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राबविलेल्या लाडली बहना योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. मध्य प्रदेशपाठोपाठ आता छत्तीसगड सरकारसुध्दा राज्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येक १ हजार रुपये देणार आहे. निवडणुकीत दिलेले महिला सशक्तीकरणाचे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारने घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरूवात झाली आहे. याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील महिलांसाठी महतारी वंदना योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना राबविण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

Mahtari Vandana Yojana
Women Leadership : स्त्री नेतृत्वाचा जागर

महतारी योजनेंतर्गत १ मार्च २०२४ पासून या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरूवात होणार आहे. ५ फेब्रूवारीपासून या योजनेसाठीचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्षे असणे आवश्यक आहे.

Mahtari Vandana Yojana
Women Income Sources : महिलांसाठी उत्पन्नाचे विविध स्रोत...

दरमहा १ हजार खात्यात येणार

मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या योजनेबाबतची घोषणा केली. महतारी वंदना योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १ हजार रुपये असे वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने सत्तेत आल्यावर महिलांसाठी महतारी वंदना योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते. मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजनेप्रमाणेच भाजपला पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी याचा उपयोग झाल्याचे मानले जात आहे. सध्या या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com