Bharat Gaurav Tourism Train: छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेचा प्रारंभ

Indian Railways Heritage Train Launch: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत, या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ सुरू करण्यात आलेली आहे.
Indian Railways
Indian RailwaysAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला आज ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत, या शुभदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ सुरू करण्यात आलेली आहे.

ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्थळांना भेट देणार आहे. यातून पुन्हा एकदा महाराजांचा इतिहास जागृत करण्याचे काम करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Indian Railways
Solapur New Railway Route : सोलापूर जिल्ह्यातील नवा रेल्वे मार्ग भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याची चौकशी

भारतीय रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड, किल्ले पर्यटनासाठी विशेष भारत गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष रेल्वेगाडीचा प्रारंभ सोमवारी (ता. ९) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह सांस्कृतिक सचिव विकास खारगे आणि पहिल्या ट्रेनने प्रवास करणारे सौभाग्यशाली प्रवासी उपस्थित होते.

Indian Railways
Railway Accident Mumbai : मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

या यात्रेचा पहिला मुक्काम हा रायगड येथे होणार आहे. यानंतर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी, प्रतापगड, पुण्यातील लाल महाल, शिवसृष्टी अशा प्रत्येक ठिकाणी ही रेल्वे जाणार आहे. यासोबतच कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन करत अतिशय प्रेरणादायी यात्रा या रेल्वेच्या माध्यमातून यात्रेकरूंना करता येणार आहे. ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून रेल्वे विभागाने त्यांच्या राहण्याची व खाण्याची अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

या रेल्वेतून ७०० पेक्षा अधिक यात्री प्रवास करत आहेत ज्यामध्ये चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज भागातील लोकांचा समावेश आहे. यात १५० महिला आहेत तर यातील ८० टक्के पर्यटक ४० वर्षांच्या आतील आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com