Sambhaji Raje : शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री भाषणे ठोकत फिरतायत ; संभाजीराजेंची टीका

Sambhaji Raje Chhatrapati on Munde : संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट असताना कृषिमंत्री उत्तर सभांतून भाषणे ठोकत फिरताय, अशा शब्दात स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांनी टीका केली.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiAgrowon

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati : राज्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, परंतु राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या जिल्ह्यात उत्तर सभा घेऊन भाषणे करण्यात धन्यता मानतात, अशी नाराजी माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

Sambhajiraje Chhatrapati
Maratha Andolan : लाठीचार्जचे आदेश देणारे ३ पोलिस अधिकारी सस्पेंड, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

स्वराज्य पक्षाच्यावतीने माजी खासदार संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या संघर्ष सभेत राज्य सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज उभा आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षणापासून दूर का ठेवलं, या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, ही बाब दुर्दैवी आहे. मागच्या सरकारला आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारलाही आम्ही जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने हंगामातील पिके धोक्यात आहेत. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आदी शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. राज्यात बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मात्र, त्याच जिल्ह्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे उत्तर सभा घेण्यात व्यस्त आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com