Illegal Smuggling : अवैध तस्करी रोखण्यासाठी सीमांवर ‘चेकपोस्ट’

Checkpost Update : अवैध धंदे रोखण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या आदेशान्वये आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट उभारले आहेत.
Checkpost
CheckpostAgrowon

Nashik News : नाशिक परिक्षेत्रातील ग्रामीणसह धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांच्या सीमा परराज्याला लागून असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात अवैध तस्करीची शक्यता वाढली आहे. यामुळे पोलीस यंत्रणा दक्ष असून, अवैध धंदे रोखण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या आदेशान्वये आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट उभारले आहेत.

या चेकपोस्टवर पोलिसांनी आतापर्यंत ३ कोटी ३ लाख २७ हजार १२२ रुपयांचा अवैध मद्यसाठा, प्रतिबंधित गुटखा व अमली पदार्थांचा साठा जप्त करीत अवैध तस्करीला ‘चाप’ लावला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. पाटील यांच्या आदेशानुसार, नाशिक ग्रामीणसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Checkpost
Water Reservoir : बुलडाणा जिल्ह्यातील १७७ जलाशये घेणार मोकळा श्‍वास

गुजरात सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी १२, धुळे पोलिसांनी दोन व नंदुरबार पोलिसांनी दहा गुन्हे दाखल करीत ४० लाख ६९ हजार ४६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तर गुटखा तस्करीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी आठ व नंदुरबार पोलिसांनी सहा गुन्हे दाखल करीत एक कोटी १३ लाख सात हजार ८९८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. मध्य प्रदेशाच्या सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी जळगाव व धुळे पोलिसांनी प्रत्येकी दोन-दोन आणि नंदुरबार पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करीत ६६ लाख ७ हजार ६८ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

मध्य प्रदेशाच्या सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी जळगाव व धुळे पोलिसांनी प्रत्येकी दोन-दोन आणि नंदुरबार पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करीत ६६ लाख ७ हजार ६८ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तर गुटखा तस्करी प्रकरणी पाच गुन्हे दाखल करीत ३७ लाख ४३ हजार ५९६ रुपयांचा गुटखा जप्त केला. अमली पदार्थप्रकरणी तीन गुन्हे दाखल करीत ४५ लाख ९९ हजार १०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. जळगाव पोलिसांनी सीमेवर कारवायांमध्ये दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली.

Checkpost
Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ८ जागांसाठी मतदान ; ऊन पावसाचे मतदानावर सावट

५५ चेकपोस्ट

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गुजरात व मध्य प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आंतरराज्य समन्वय बैठक झाली. या बैठकीत तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात एकूण ५५ चेकपोस्ट उभारले आहेत. धुळे जिल्ह्यातील गुजरात सीमेलगत तीन, मध्य प्रदेश सीमेलगत सहा चेकपोस्ट तसेच नंदुरबार जिल्ह्यात गुजरात सीमेलगत सर्वाधिक २१ व मध्य प्रदेश सीमेलगत पाच, नाशिक ग्रामीणमधील गुजरात सीमेलगत १३, जळगाव जिल्ह्यात मध्य प्रदेश सीमेलगत सात चेकपोस्ट उभारले आहेत.

‘सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारले असून, तेथे सीसीटीव्ही बसविले आहेत. तसेच, व्हिडिओ शूटिंग केली जात आहेत. महिनाभरात मध्य प्रदेशमधील २०, गुजरातमधील २४ गुन्हेगारांविरोधात वॉरंट बजावून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच चोरट्या मार्गांचा अवलंब होऊ नये, यासाठी गस्ती व नाकाबंदी कठोरपणे करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com