Environment Conservation : पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

Cow Farming : वास्तुविशारद श्रीनिवास आणि त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी वारखंडकर यांनी मुंबईतील सुखवस्तू जीवनाला कायमचा रामराम ठोकला आहे.
Environment Conservation
Environment ConservationAgrowon

Pune News : वास्तुविशारद श्रीनिवास आणि त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी वारखंडकर यांनी मुंबईतील सुखवस्तू जीवनाला कायमचा रामराम ठोकला आहे. रायगडच्या डोंगररांगेत बांबूघरात राहून शेती, गोपालन करीत हे दांपत्य पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश देत आहे.

भौतिक सुखासाठी पर्यावरणावर घाला नको. सिमेंट काँक्रीटच्या घरांवर लाखो रुपये खर्च करणेही गैर असल्याचे वास्तुविशारद श्रीनिवास मानतात. साध्या बांबूघरात राहूनदेखील आनंदाने जगता येते असे त्यांचे म्हणणे होते.

केवळ संदेश न देता काँक्रीटची मुंबई त्यांनी कायमची सोडली. माणगावच्या डोंगरी भागात आंबर्ले गावच्या हद्दीतील उभारेवाडीत त्यांनी शेती घेतली. तेथील बांबूघरात २००९ पासून हा परिवार आनंदाने राहतो आहे. आयुष्यात कधीही काँक्रीटची वास्तुरचना साकारणार नाही, असा संकल्प श्रीनिवास यांनी सोडला आहे.

Environment Conservation
Environment Conservation : बदलापूरमध्ये दुर्मीळ झाडांचा खजिना

‘‘आमची येथील निसर्ग शेती केवळ बारा गुंठ्यांची. अतिपावसामुळे फक्त भात पिकतो. फळबाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्याच वर्षी अतिपावसाने बाग उद्ध्वस्त झाली. पर्यावरणपूरक बांबूघर उभारण्याचे प्रकल्प मी हाती घेतो. त्यातून आमचा उदरनिर्वाह चालतो,’’ असे श्रीनिवास सांगतात. पतीच्या निसर्गप्रेमाला साथ देण्यासाठी डॉ. रश्मी यांनी बोरिवलीतील चांगला वैद्यकीय व्यवसाय बंद केला आणि त्यांनीही उभारेवाडीत राहणे पसंत केले आहे.

Environment Conservation
Environment Conservation : पर्यावरण संरक्षणातून शेतकऱ्यांचा फायदा

डॉ. रश्मी या भागातही मोठा दवाखाना किंवा हॉस्पिटल थाटू शकल्या असत्या. परंतु परिसरातील गरीब शेतमजूर व शेतकऱ्यांना औषधोपचार पुरवणे व इतर वेळी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये गुंतवून घेणं त्यांनी पसंत केलं आहे.

‘‘प्रदूषणातील सुखवस्तू जगणं, तेथील स्पर्धाही आम्हाला नको होती. त्यामुळेच आम्ही आम्ही मुंबई सोडली. या भागात भेकर, रानडुकरे, बिबट्याचा वावर असतो. पण आम्हाला कधीही त्रास झालेला नाही. या डोंगराळ भागात राहण्यासाठी आलो तेव्हा आमची कन्या दिशा ही केवळ पाच वर्षांची होती. आम्ही गायींचा गोठा सांभाळतो. त्यात चंदन, दुर्गा, गौतमी, वेणू, सिंधू आणि गौरी अशा गायी आहेत. सर्व मला अगदी मुलीसमान आहेत,’’ असे डॉ. रश्मी सांगतात.

मराठी भाषेच्या प्रेमात पडलेली दिशा

वारखंडकर दांपत्यांची एकुलती एक लेक म्हणजे दिशा. उच्चशिक्षित घरात असूनही ती मराठीत शिकली. गोरेगाव महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकणारी दिशा मराठी भाषेवर नितांत प्रेम करते. ‘‘अनेकदा मराठीच्या तासाला वर्गात मी एकटी असते. शिक्षक मंडळीही मला आवडीने शिकवतात. मराठी मला खूप आवडते. भविष्यात ही भाषा शिकवणे, तिचे संवर्धन करणे मला आवडेल.’’ असे दिशाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com