Mantralaya Security System: फेस डिटेक्शनमुळे मंत्रालयात गोंधळ

Face Detection Issue: मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनमुळे सोमवारी (ता. ३) गोंधळ उडाला. अनेकांच्या चेहऱ्याची ओळख मशिनमध्ये न झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळाला नाही. तर नियमित प्रवेश पास आणि ओळखपत्र असलेल्यांनाही प्रवेश नाकारल्याने वादावादीचे प्रसंग घडले.
Mantralaya
MantralayaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनमुळे सोमवारी (ता. ३) गोंधळ उडाला. अनेकांच्या चेहऱ्याची ओळख मशिनमध्ये न झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळाला नाही. तर नियमित प्रवेश पास आणि ओळखपत्र असलेल्यांनाही प्रवेश नाकारल्याने वादावादीचे प्रसंग घडले. अखेर ओळखपत्र आणि पासवर प्रवेश देण्यात आला.

मंत्रालयात अनावश्यक प्रवेश करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी एफआरएस प्रणाली आणली आहे. मुख्य प्रवेशद्वार, आकाशवाणी प्रवेशद्वार आणि आरसा गेटवर सुरक्षा कवच लावले आहे. येथे लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये चेहऱ्याचे स्कॅनिंग केले जात आहे. मात्र, काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फेस स्कॅनिंग झालेले नाही त्यांना प्रवेशद्वारावरच ताटकळत रहावे लागले.

Mantralaya
Delhi Politics: डाव केंद्राचा, पेच ‘आप’चा

मंत्रालयात नियमित येणाऱ्यांना गृह विभागाने ओळखपत्र दिले आहे. यामध्ये पत्रकारांचाही समावेश आहे. मात्र, हे ओळखपत्रही नाकारण्यात आले. तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सर्व प्रवेशद्वारांमधून प्रवेश देण्यात येत होता. तोही नाकारण्यात आल्याने पत्रकारांना मंत्रालयात जाता आले नाही. हा गोंधळ वाढल्यानंतर काही वेळातच ओळखपत्रांवर प्रवेश देण्यात आला.

अजब निर्णय; नागरिक त्रस्त

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी बैठका आणि अन्य कामांसाठी मंत्रालयात येत असतात. तसेच विविध माध्यमांचे पत्रकार येतात. त्यांना सकाळी ११ पासून प्रवेश देण्यात येत होता. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओळखपत्रावर पास देण्यात येत होता.

Mantralaya
Maharashtra Politics : 'हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न'; पीक विम्यावरून महाविकास आघाडीची घाणाघाती टीका

तर पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रावर थेट प्रवेश दिला जात होता. दिवसभराभध्ये कधीही मंत्रालयात सहज प्रवेश करता येत होता. नव्या नियमानुसार दुपारी २ नंतर येणारे अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना सर्वसामान्य नागरिकांच्या रांगेतून प्रवेश करावा लागणार आहे. ही रांग कधी कधी ३०० ते ४०० मीटर लांब लागते.

मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध आणण्यासाठी आणलेली ही प्रणाली नेमकी कशासाठी आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत आहे. सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील १० हजार ५०० अधिकारी आणि कर्मचारी यांचा तपशील या प्रणालीत सादर केलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com