Ashadhi Wari : पालखी मार्गावरील वाहतुकीत २१ ते २९ जूनपर्यंत बदल

Palkhi Update : येत्या २१ जून रोजीच्या रात्री एक वाजल्यापासून ते २९ जून रोजीच्या रात्री १२ पर्यंत हा आदेश लागू राहील.
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon
Published on
Updated on

Solapur News : अकलूज व पंढरपूर या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून पालखी दिंड्यांसोबत असणाऱ्या वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांनी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी काढले आहेत.

येत्या २१ जून रोजीच्या रात्री एक वाजल्यापासून ते २९ जून रोजीच्या रात्री १२ पर्यंत हा आदेश लागू राहील. २३ ते ३० जून या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी पार पडणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २३ जून रोजी नातेपुते पोलिस ठाणे हद्दीत व २४ जून रोजी श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलिस ठाणे हद्दीत प्रवेश करणार आहे.

Ashadhi Wari
Palkhi Sohala: संत तुकराम महाराजांची पालखी पोहचली पुण्यात

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव वाखरी मार्गे पंढरपूरकडे येते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलुज, श्रीपूर, बोरगाव, तोंडले-बोडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरकडे येते. त्यामुळे या दोन्ही पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. हे वारकरी पायी पंढरपूरकडे येत असतात.

पालखीबरोबर त्यांच्या दिंड्या व वाहनेही सोबत असतात, त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता पालखी सोहळ्यादरम्यान पालखी सोहळ्यातील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करणे आवश्यक आहे.

मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे...

मार्ग - पंढरपूरकडून पुणे येथे जाणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग - वाखरी-साळमुख चौक-पिलीव-म्हसवड-फलटण, पंढरपूर- टेंभुर्णी-पुणे

मार्ग - पुणे-फलटण येथून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग -फलटण चौक-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक, पुणे-टेंभुर्णी-पंढरपूर

मार्ग - अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग- अकलूज-टेंभुर्णी-सोलापूर

Ashadhi Wari
Mauli Palkhi Sohala : माऊली-तुकोबांच्या पालख्या पुण्यनगरीत मुक्कामी

मार्ग - सोलापूर येथून पंढरपूर मार्गे अकलूजकडे जाणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग- सोलापूर- टेंभुर्णी- अकलूज

मार्ग - वेळापूर येथुन पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग - साळमुख चौक-सातारा रोड-पंढरपूर

मार्ग - सांगोला येथुन पुणेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग - सांगोला-साळमुख चौक-वेळापूर-अकलूज- इंदापूर

मार्ग - पुणे येथुन इंदापूर मार्गे पंढरपूर येथे येणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग - पुणे- टेंभुर्णी-पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com