Mauli Palkhi Sohala : माऊली-तुकोबांच्या पालख्या पुण्यनगरीत मुक्कामी

Ashadi Wari : यंदा आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी वर्ग मोठ्या संख्येने वारीत सामील झाला आहे.
पालखी सोहळा
पालखी सोहळाAgrowon
Published on
Updated on

Pune News : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं ११ जून रोजी आळंदीतून प्रस्थान झालं. त्यानंतर १२ जून रोजी पालखी पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आज संध्याकाळी पोहचली. विठ्ठलाच्या नामघोषात दंग झालेली हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झालेली पाहायला मिळाली.

२८ जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरला पोहचेल. यंदा आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी वर्ग मोठ्या संख्येने वारीत सामील झाला आहे.

१२ आणि १३ रोजी पुण्यातील मुक्कामानंतर माऊलींची पालखी १४ आणि १५ जून रोजी सासवड येथे मुक्काम असेल. त्यानंतर १६ आणि १७ जून रोजी अनुक्रमे जेजूरी आणि वाल्हे येथे मुक्कामी थांबणार आहे.

१८ आणि १९ रोजी नीरा स्नान करून पालखी २० जून रोजी तरडगाव येथे चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगणासाठी पोहचेल. त्यानंतर २१, २२ व २३ जून रोजी माऊलींची पालखी अनुक्रमे फलटण, बरड आणि नातेपुते येथे मुक्काम करेल.

२४ जून रोजी माळशिरस पुरंदवडे येथे गोल रिंगण तर २५ जून वेळापुर येथे खुडूस फाटा गोल रिंगण करून भंडीशेगाव येथील ठाकूरबुवा समाधीचं गोल रिंगण २६ जून रोजी करणार आहे.

त्यानंतर वाखरी येथे २७ जून रोजी बाजीरावची विहीर उभे रिंगण आणि दुसरे गोल रिंगण करून पंढरपुर येथे २८ जून रोजी इसबावी पादुका उभे रिंगण करणार आहे.

दरम्यान, देशातील कानाकोपऱ्यातून वारकरी वारीत सामील झाले आहेत.

पालखी सोहळा
Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

तुकोबांचा पालखी सोहळा वेळापत्रक

१० जून- प्रस्थान

११ जून- आकुर्डी

१२-१३ जून- नानापेठ

१४ जून - लोणीकाळभोर

१५ जून- यवत

१६ जून- वरवंड

१७ जून- ऊंडवडी

१८ जून- बारामती

१९ जून- सणसर

२० जून- आंथुर्णे

२१ जून- निमगाव केतकी

२२ जून- इंदापूर

२३ जून- सराटी

२४ जून- अकळूज

२५ जून- माळीनगर

२६ जून-पिराची कुरोली

२७ जून- बाजीराव विहीर

२८ जून- पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com