Sugarcane Harvester : चांगतपुरी गावची पंजाब आणि हरियानाशी स्पर्धा

Sugarcane Season : या इवल्याशा गावात आज एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ ‘हार्वेस्टर’ झाले. त्यांना मराठवाडाभरातून मागणी आहे.
Sugarcane Harvester
Sugarcane Harvester Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : शेतीत जसे कष्ट आहेत, तसा धोकाही आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी पुत्र शेतीला नाही म्हणतात. पण, जिल्ह्यातील चांगतपुरी (ता. पैठण) या दीड हजार उंबऱ्यांच्या गावातील शेतकरी पुत्रांनी शेतीलाच सर्वस्व मानले.

एवढेच नाही तर या क्षेत्रातील गरज ओळखून त्या दिशेने पावले टाकली. या इवल्याशा गावात आज एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ ‘हार्वेस्टर’ झाले. त्यांना मराठवाडाभरातून मागणी आहे. त्यामुळे चांगतपुरीवासीयांच्या मातीची अस्मिता सर्वत्र पोचली. आता हार्वेस्टरच्या बाबतीत या गावाची स्पर्धा पंजाब आणि हरियानाशी आहे.

Sugarcane Harvester
Sugarcane Harvesting : ऊस तोडणी व्यवस्थापनातील बाबी

पूर्वी ऊसतोडीसाठी हार्वेस्टर हवे असल्यास थेट पंजाब किंवा हरियानात संपर्क करावा लागत असे. तेथील हार्वेस्टर मालकही तीन-चार शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर पाठवू शकत नव्हते.

Sugarcane Harvester
Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

त्यांना किमान ३० ते ४० शेतकऱ्यांकडून ऑर्डर असेल तरच ते हार्वेस्टर पाठवत. त्यासाठी दरही जास्त आकारत असत. त्यामुळे मराठवाड्यातील मोजकेच आणि मोठे शेतकरी जास्त पैसे देऊन या राज्यांतून हार्वेस्टर मागवून घेत.

हार्वेस्टरची मागणी वाढली आहे. मला त्याचा फायदा झाला. त्यामुळे मी २०२३ मध्ये पुन्हा एक हार्वेस्टर खरेदी केले. आता ऊस तोडणीला सुरवात झाल्यापासून दोन्ही हार्वेस्टर २० ते २२ तास चालतात.
- नवनाथ गिते, व्यावसायिक, चांगतपुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com