Crop Competition : खरीप, रब्बी पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव

Agriculture Department : कृषी विभागातर्फे २०२३-२४ च्या खरीप व रब्बी पीक स्पर्धेतील परभणी तालुक्यातील जिल्हास्तरीय तसेच तालुका स्तरीय विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी (ता. १०) करण्यात आला.
Crop Competition
Crop Competition Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : कृषी विभागातर्फे २०२३-२४ च्या खरीप व रब्बी पीक स्पर्धेतील परभणी तालुक्यातील जिल्हास्तरीय तसेच तालुका स्तरीय विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी (ता. १०) करण्यात आला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, तंत्राधिकारी बाळासाहेब गाढवे, मंडळ कृषी अधिकारी शीतल पौळ, सोमेश्वर गिरी, योगेश निलवर्ण, अविनाश खिल्लारे, हरिभाऊ जाधव, बी. आर. राठोड, उमेश माने आदी उपस्थित होते.

Crop Competition
State-Level Crop Competition: राज्यस्तरीय पीकस्पर्धेत पाटील, राजोळे, खोत प्रथम

चव्हाण म्हणाले, की पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांकडून उत्पादकता वाढीचे तंत्र अवगत करून इतर शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत. काळे म्हणाले, की शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या अंगीकारासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. या वेळी विजेत्या शेतकऱ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Crop Competition
Crop Competition : खरीप-रब्बी पीक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

खरीप पीक स्पर्धा...

सोयाबीन ः जिल्हास्तर ः प्रथम, मंगेश देशमुख, तृतीय, सत्यभामा झाडे. तालुकास्तर ः प्रथम, रमेश देशमुख, द्वितीय, वशिष्ठ शिंदे, तृतीय, तुकाराम रेंगे, तूर ः प्रथम सुरेश कनके, द्वितीय, उत्तम कोल्हे, तृतीय, बालासाहेब लांडगे.

रब्बी पीक स्पर्धा...

ज्वारी ः जिल्हास्तर ः प्रथम, हरिहर शिंदे, तृतीय, शकुंतला शिंदे, तालुकास्तर ः प्रथम, लिंबाजी शिंदे, प्रल्हाद शिंदे, शांताबाई शिंदे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com