Crop Competition : खरीप-रब्बी पीक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

Farmer Award : जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मंगळवारी (ता. १८) परभणी जिल्ह्यातील खरीप व रब्बी पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
Crop Competition Prize Distribution
Crop Competition Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मंगळवारी (ता. १८) परभणी जिल्ह्यातील खरीप व रब्बी पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, उपविभागीय अधिकारी रवी हरणे, तालुका कृषी अधिकारी एल. ए. शिंदे (जिंतूर), प्रियांका कावरे (सोनपेठ), गोविंद कोल्हे (पाथरी), नित्यानंद काळे (परभणी), ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके आदी उपस्थित होते. विजेत्या शेतकऱ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

खरीप २०२३-२४ मधील सोयाबीन व तूर आणि रब्बी २०२३-२४ मधील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वसाधारण गटात तसेच रब्बी हंगामात आदिवासी गटात सहभागी शेतकऱ्यांपैकी प्रतिहेक्टरी सरस उत्पादकता आलेल्या शेतकऱ्यांमधून पीकनिहाय गुणाक्रमे तीन विजेत्यांनी निवड करण्यात आली. प्रथम क्रमांकाचे बक्षीस १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकांचे बक्षीस ५ हजार रुपये आहे. परभणी जिल्हास्तरीय पीक स्पर्धेतील गुणानुक्रमानुसार विजते शेतकरी (कंसात प्रतिहेक्टरी उत्पादन)...

Crop Competition Prize Distribution
State-Level Crop Competition: राज्यस्तरीय पीकस्पर्धेत पाटील, राजोळे, खोत प्रथम

खरीप पीक स्पर्धेतील विजेते...

सोयाबीन ः प्रथम, मंगेश देशमुख, पेडगाव, ता. परभणी (५१.२२ क्विंटल), द्वितीय, नारायण मोरे, दस्तापूर, ता. पूर्णा (५० क्विंटल), तृतीय, सत्यभामा झाडे, मुरुंबा, ता. परभणी (४८.४६ क्विंटल).

तूर ः प्रथम, संतोष देशमुख, पाचलेगाव, ता. जिंतूर (२३ क्विंटल), द्वितीय,पंडितराव शिंदे, सोस, ता. जिंतूर (२१.५ क्विंटल), तृतीय, भगवान ठोंबरे, भोसी, ता. जिंतूर (२० क्विंटल).

रब्बी पीक स्पर्धेतील विजेते...

सर्वसाधारण गट

हरभरा ः प्रथम, प्रवीण रोडगे, रवळगाव, ता. सेलू, (३६.६१ क्विंटल), द्वितीय, कैलास देशमुख, कौसडी, ता. जिंतूर (३३.७१ क्विंटल), तृतीय, विलास रोडगे, रवळगाव, ता. सेलू (३३.१९ क्विंटल),

ज्वारी ः प्रथम, हरिहर शिंदे, वांगी, ता. परभणी (४१.१८ क्विंटल), द्वितीय, कैलास देशमुख, कौसडी, ता. जिंतूर (३३.७३ क्विंटल), तृतीय, शकुंतला शिंदे, वांगी, ता. परभणी (३३.०३ क्विंटल).

गहू ः प्रथम, विजयमाला देशमुख, कौसडी, ता. जिंतूर(३९.३४ क्विंटल), द्वितीय, नामदेव ढाकरे, पिंप्राळा, ता. जिंतूर (३८.०१ क्विंटल), आनंद घोगरे, साखरतळा, ता. जिंतूर (३७.७६ क्विंटल).

Crop Competition Prize Distribution
Rabi Crop Competition : रब्बी पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा

आदिवासी गट....

ज्वारी ः प्रथम, रोहिदास एम्लवाड, कोळेवाडी, ता. पालम, द्वितीय, पुष्पाबाई मेकेवाड, कोळेवाडी, ता. पालम (१३.२१क्विंटल), किशन यमलवाड, कोळेवाडी, ता. पालम (१३.१६ क्विंटल).

कृषी महोत्सवातील उत्कृष्ट स्टॉल

गृहउद्योगः प्रथम, उमंग अॅग्रो फुड प्रॉडक्ट (डासाळा, ता. सेलू), द्वितीय, मंगेश देशमुख, शिर्शी, ता. सोनपेठ, तृतीय संत जनाबाई महिला स्वयंसाह्यता गट, मुरुंबा, ता. परभणी, सेंद्रिय उत्पादनेः प्रथम, श्री.चक्रधर स्वामी शेतकरी गट, खानापूर, ता. परभणी, द्वितीय, वानगंगा सेंद्रिय धान्य उत्पादक गट, सोनपेठ, तृतीय, श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा, राणीसावरगाव, ता. गंगाखेड.

अन्नधान्ये उत्पादने ः प्रथम, शशिकांत फुलमंटे, खडी, ता. पालम, समृद्ध बळीराजा शेतकरी गट, बोंदरगाव, ता. सोनपेठ, तृतीय, कृषिकन्या महिला शेतकरी गट, कान्हेगाव, ता. सोनेपठ, पशुपालन ः प्रथम, बळिराम लाड, माळसोन्ना, ता. परभणी, द्वितीयनितिन गायकवाड, रामपूर, ता. पूर्णा, तृतीय सचिन लाड, माळसोन्ना, ता. परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com