Pune APMC: पुणे बाजार समितीमधील सेस गळती रोखणार

Prakash Chandrakant Jagtap: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेस गळती होत आहे. ही गळती कमी करत उत्पन्न वाढीवर भर देणार आहे. मात्र या बाबत पणन संचालकांकडून केली जाणारी चौकशी चुकीची असल्याचा दावा बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप यांनी केला.
chairman of the Market Committee, Prakash Chandrakant Jagtap
chairman of the Market Committee, Prakash Chandrakant JagtapAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेस गळती होत आहे. ही गळती कमी करत उत्पन्न वाढीवर भर देणार आहे. मात्र या बाबत पणन संचालकांकडून केली जाणारी चौकशी चुकीची असल्याचा दावा बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप यांनी केला. तसेच बाजार समितीच्या गैरव्यवहारांच्या चौकशीच्या बाबतीत माहिती नसल्याचेही ते म्हणाले.

पुणे बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. १८) झाली. श्री. जगताप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी निवड जाहीर केली.

chairman of the Market Committee, Prakash Chandrakant Jagtap
Pune APMC: अतिक्रमण कारवाई संथगतीने, मंत्र्यांच्या आदेशाची मोडतोड

या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना सभापती जगताप म्हणाले, ‘‘बाजार समितीवर झालेले सर्व आरोप हे राजकीय प्रेरणेतून झालेले आहेत. पणन संचालकांनी ५१ मुद्द्यांवर लावलेली चौकशी चुकीची आहे.

बाजार समितीमध्ये कायम कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे सेसमध्ये काही प्रमाणात गळती असल्याचे जगताप यांनी मान्य केले. ही सेस गळती रोखत दरवर्षी उत्पन्न ५ ते १० टक्क्यांनी वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

chairman of the Market Committee, Prakash Chandrakant Jagtap
APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

गैरव्यवहारांच्या चौकशांच्या फेऱ्यात अडकलेल्या बाजार समितीला कसे बाहेर काढणार या प्रश्‍नावर श्री. जगताप म्हणाले, ‘‘आम्ही निवडणुकीच्या धामधुमीत होतो. त्यामुळे गैरव्यवहारांच्या झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही.

त्यानुषंगाने आम्ही सर्व एकत्रित येऊन त्यावर विचार विनिमय करून उत्तर देऊ. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीचे उत्पन्न ८० कोटी रुपये होते. ते सध्या १०६ कोटींवर गेले आहे. बाजार समितीत गैरप्रकार झाले असते तर उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढले नसते.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com