Agriculture Degree Admissions : कृषी पदवीचे केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश सुरू

Spot Admissions : कृषी पदवीच्या रिक्त जागांकरिता केंद्रीभूत केंद्रनिहाय (स्पॉट ॲडमिशन) प्रवेश फेरी २ सप्टेंबर ऐवजी शुक्रवार (ता. ३०)पासून सुरू झाली आहे.
Agriculture Degree Admissions
Agriculture Degree AdmissionsAgrowon
Published on
Updated on

Nagar News : कृषी पदवीच्या रिक्त जागांकरिता केंद्रीभूत केंद्रनिहाय (स्पॉट ॲडमिशन) प्रवेश फेरी २ सप्टेंबर ऐवजी शुक्रवार (ता. ३०)पासून सुरू झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कृषी पदवीच्या रिक्त जांगांकरिता प्रवेश फेरी यापूर्वी २ ते ७ सप्टेंबर या कालावधीमध्ये राबविणार होती.

तथापि यामध्ये आता केंद्रीभूत प्रवेश फेरी ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव अरुण आनंदकर यांनी सांगितले.

Agriculture Degree Admissions
Agriculture Colleges : रिक्त पदांमुळेच कृषी विद्यापीठांची दुरवस्था

कुलसचिव आनंदकर यांनी सांगितले की, कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही प्रवेश प्रक्रिया दोन केंद्रावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिले प्रवेश प्रक्रिया केंद्र राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय असून यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव या जिल्ह्यातील सर्व घटक/विनाअनुदानित कृषी महाविद्यालये यांचा समावेश आहे.

Agriculture Degree Admissions
RTE Admission Process : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा २० हजार परंतू प्रवेश १३ हजारच

दुसरे प्रवेश प्रक्रिया केंद्र पुणे येथील कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर असून याअंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतील सर्व घटक/विनाअनुदानित कृषी महाविद्यालये यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी ३० ऑगस्टला ८५ पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना बोलविण्यात आलेले आहे.

दुसऱ्या दिवशी ३१ ऑगस्टला ६५ पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना आलेले आहे. १ सप्टेंबरला ५० पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना बोलविण्यात आलेले आहे. ३ सप्टेंबरला ३५ पर्सेंटाईल व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना बोलविण्यात आलेले आहे. ४ सप्टेंबरला गुणवत्ता यादीतील सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश प्रक्रियांसाठी बोलविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com