केंद्र सरकारनं पिकांचं व्यवस्थापन आणि उत्पादक वाढवण्यासाठी कृषी डीडीएस अर्थात 'अॅग्रीकल्चर डिसीजन सपोर्ट सिस्टम' वेबपोर्टल लॉच केलं आहे. केंद्र सरकारला डीडीएसच्या मदतीने अचूक माहिती मिळवता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्य कृषिमंत्री भगीरथ चौधरी यांनी दिल्ली. मंत्री चौधरी यांनी शुक्रवारी (ता.१६) नवी दिल्ली येथे कृषी डीडीएसचं अनावरण केलं. हवामान बदलाच्या काळात कृषी डीडीएस शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला. कृषी मंत्रालयाने भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर राष्ट्रीय परिषद आयोजित केली.
चौधरी म्हणाले, "या माध्यमाच्या मदतीने पिकांची अचूक माहिती, हवामानाचे नमुने, पाणीसाठा, भूजलाची पातळी आणि जमीनच्या आरोग्याची माहिती मिळणार आहे." असा दावाही चौधरी यांनी केला आहे. कृषी डीडीएसच्या मदतीने पिकांवरील संभाव्य किटकांचा प्रभाव आणि हवामानातील घटनांची माहिती घेता येणार आहे.
वेगवेगळ्या वर्षांतील पीक नकाशेचं विश्लेषण करून पीक पद्धती समजून घेऊ शकतो. ही माहिती पीक फेरबदल पद्धती समजून घेण्यास मदत करते आणि विविध पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देऊन शाश्वत शेतीला चालना देते, असा दावाही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
दुष्काळची माहिती मिळणार
कृषी डीडीएसच्या मदतीने दुष्काळावर लक्ष ठेवता येईल. त्यामध्ये मातीची आर्द्रता, पाणी साठवण, पीक स्थिती, कोरडेपणा आणि हवामानशास्र विभागाचे अंदाज यांची माहीत रियल टाईम माहिती मिळते. केंद्र सरकारकडे मातीचं आरोग्य कार्ड योजनेचा डाटा उपलब्ध आहे. त्यामुळे कृषी डीडीएस पोर्टलच्या मदतीने त्याचे विश्लेषण केल्यावर शेतकऱ्यांना पीक योग्यता आणि मृदा जलसंधारणाच्या उपाययोजना लागू करण्यासाठी याबाबत सल्ला देण्यात मदत होईल, असं कृषी मंत्रालयाने सांगितलं.
कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी कृषी क्षेत्रातील अंतराळ तंत्रज्ञानाच्या फायद्यांकडे लक्ष वेधलं. चतुर्वेदी म्हणाले, पिकांमध्ये रिमोट सेन्सिंग प्रणालीचा वापर वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे त्यावर लक्षकेंद्रित करण्याची गरज व्यक्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.