केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी (ता.१५) दिल्लीतील पुसा येथील सुब्रमण्यम हॉलमध्ये राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली (एनपीएसएस) लॉंच केली. यामध्ये प्रणालीच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांवरील कीडरोगांचे फोटो सरकारला पाठवता येणार आहेत. तसेच कीडरोगांवरील प्रादुर्भावचं प्रमाण किती आहे आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत, यासाठी सरकार मदत करणार आहे.
चौहान म्हणाले, कीडरोगांच्या प्रादुर्भावानंतर शेतकरी किटकनाशक विक्रेत्याकडे जातात. त्यांच्याकडून सला घेतात. आणि त्यानुसार किटकनाशक खरेदी करतात. पण आता या अॅपमुळे शेतकऱ्यांना योग्य सल्ला मिळणार आहे. तसेच कीडरोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी योग्य किटकनाशक खरेदी करण्यात मदत होईल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.
अॅपचा वापर कसा ?
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारी अॅप शेतकऱ्यांनी मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपवरून कीडरोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांचा फोटो अपलोड करता येणार आहे. सरकारकडून मिळाली माहिती गोळा केली जाईल. त्या माहितीवरून पिकांचं स्थान निश्चित करण्यात येईल. त्यानंतर एआयच्या मदतीने अधिक चांगलं विश्लेषण करता येईल. जेणेकरून किडरोगांचं व्यवस्थापन करता येईल.
किसानो की बात
सप्टेंबर महिन्यापासून ऑल इंडिया रेडिओवरून 'किसानो की बात' नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय कृषिमंत्री चौहान यांनी दिली. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या 'मन की बात'च्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी 'किसानो की बात' कार्यक्रम आकाशवाणीवरून महिन्यातून एकदा प्रसारित करण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ संवाद साधतील." असंही चौहान म्हणाले.
पुढे चौहान म्हणाले, "शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांना जोडणं आमचं काम आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांना माहिती नसल्यानं चुकीचं कीटकनाशक वापरतात. शेतकऱ्यांना विज्ञानाचा फायदा मिळावा, यासाठी आम्ही महिन्यातून एकदा शेतकरी संवाद कार्यक्रम सुरू करू. यामध्ये शेतकऱ्यांसोबत शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी सहभागी होतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.