Aslam Abdul Shanedivan
कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा आणि देशाला गौरव मिळवून देणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म विभूषण, पद्म भूषम आणि पद्मश्री असे पुरस्कार दिले जातात. मात्र सध्या हे परत देण्याच्या घटना समोर येत आहेत.
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यामुळे पदक वापसिची चर्चा होत आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिने कुस्ती सोडत निवृत्ती जाहिर केल्यावरून बजरंग पुनिया याने सरकारवर टीका केली होती.
आपल्या देशातील सर्वोच्च असे हे पुरस्कार आहेत. ते परत करण्याची घोषणा पुरस्कार विजेता करू शकतो. मात्र पद्म पुरस्कार परत करण्याचे कोणताही नियम नाहीत.
कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या घोषणेआधी देखील अनेक खेळाडू आणि प्रतिष्ठितांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याच्या घोषणा केल्या आहेत. पण फक्त पुरस्कार रद्द राष्ट्रपती करू शकतात.
कोणतेही कारण देऊन पुरस्कार परत करण्याची घोषणा अथवा पुरस्कार परत जरी केला तरी तो रद्द होत नाही. पुरस्कार विजेत्यांच्या यादीत त्याचे नाव हे कायम असतेच. त्यामुळे पुरस्कार परत करण्याची तरतूद नाही.
पुरस्कार सुचित व्यक्तिची तपास यंत्रणांकडून चारित्र्याची पडताळणी केल्यानंतरच पुरस्कार दिले जातात, असे 2018 मध्ये तत्कालीन गृहमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले होते.
पद्म पुरस्कारांचे तीन प्रकार आहेत, त्यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. ⦁ पद्मविभूषण- हा पुरस्कार भारतरत्न नंतरचा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ⦁ पद्मभूषण- हा देशाच्या पद्म पुरस्कारांपैकी दुसरा आणि भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ⦁ पद्मश्री- हा पद्म पुरस्कारांपैकी तिसरा आणि भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यामध्ये फुलाच्या खाली पद्मश्री असे लिहिले आहे.