Nana Patole: मुंबईत सेलिब्रिटी आणि गावांत सरपंच सुरक्षित नाहीत : नाना पटोले

Security Issues: राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी आणि गावांमध्ये सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी आणि गावांमध्ये सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नागपुरमध्ये गुरुवारी (ता. २३) प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, की राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री डागाळलेले असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे.

Nana Patole
Nana Patole : गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था? नाना पटोलेंची टीका

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याकडे जाती धर्माच्या दृष्टिकोनातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही. या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजप युती सरकारनेच निर्माण केला आहे. त्यातून जनतेचे मूळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत.

Nana Patole
Nana Patole : परभणीत हिंसाचार सरकार बेफिकीर; महायुतीत मंत्रीपदे व मलईदार खात्यांसाठी मारामारी, पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

शेतीमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जाती-धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

भाजप युतीचा खरा चेहरा उघडा पडला

विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणी’ची मते हवी होती म्हणून सर्व बहिणींना योजनेचा लाभ दिला, याच बहिणींच्या मतांवर सत्तेत आले आणि आता भाजप युती सरकारला लाडकी बहीण योजनेतील त्रुटी दिसत आहेत का? बहिणींची मते घेताना या त्रुटी व पारदर्शकता दिसली नाही का? सरकार आल्यानंतर पडताळणी करण्याची गरज का पडावी?

बोगस लाभार्थी बहिणींकडून पैसे परत घेण्याची धमकी मंत्री देत आहेत, यातून भाजप युतीचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजप युती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक ‘लाडक्या बहिणी’ला सरसकट २१०० रुपये दिले पाहिजेत, असेही पटोले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com