Animal Ear Tagging : ‘ईयर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद

Illegal Animals Transport : एक जूनपासून होणार प्रभावी अंमलबजावणी
Animal Ear Tagging
Animal Ear TaggingAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani News : परभणी : ‘‘जनावरांची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी ‘ईयर टॅगिंग’ शिवाय इतर राज्यांतील जनावरे राज्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या १ जूनपासून याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
‘ईयर टॅगिंग’ नसलेली जनावरे बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केल्याने बेकायदा कत्तलींना आळा बसेल.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन’अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत ‘ईयर टॅगिंग’ (१२ अंकी बारकोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्यात जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतर यांचा समावेश आहे.

Animal Ear Tagging
Animal Ear Tagging : जनावरांचे टॅगिंग न केल्यास खरेदी-विक्रीला रोख लागणार

जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत जनावरांच्या कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल. परभणी जिल्ह्यात २० पशुगणनेनुसार गायवर्गीय २ लाख ९९ हजार ८६१ आणि म्हैस वर्गीय ९८ हजार ४९५ जनावरे आहेत, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

‘ईयर टॅगिंग’शिवाय मदतही नाही’
‘‘जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती, नगर परिषदा, पालिका, महापालिकांना पशुधनाची ‘ईयर टॅगिंग’ करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. १ जून २०२४ नंतर ‘ईयर टॅगिंग’ शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, पशुचिकित्सालयातून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. कत्तलखान्यात टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी मिळणार नाही,’’ असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com