Raghunath Gawde : आपत्कालीन स्थितीत समन्वय राखत जबाबदारी पार पाडा‌

Emergency Situation Update : प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी सांघिक वृत्तीने योग्य समन्वय राखून जबाबदारी पार पाडावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
Emergency Situation
Emergency SituationAgrowon

Parbhani News : ‘‘आगामी पावसाळ्यात प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे. जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा महापुरासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्‍वल्यास जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी सांघिक वृत्तीने योग्य समन्वय राखून जबाबदारी पार पाडावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

Emergency Situation
Efficon Pesticide : ‘बीएएसएफ’चे ‘इफिकॉन’ कीटकनाशक बाजारात दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉन्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत गावडे बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, दत्तू शेवाळे, संगीता चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता राजाराम माने, डॉ. किशोर सुरवसे उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी आपापल्या स्तरावर तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या संयुक्त आढावा बैठका सोमवारपर्यंत (ता. १३) घेऊन तसा अहवाल १६ मेपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.

Emergency Situation
Marut Dronetech Partnership with IFFCO : ‘मारुत ड्रोनटेक’ची ‘इफ्को’शी धोरणात्मक भागीदारी

‘‘जिल्ह्यात नदी काठावर ११८ गावे आहेत. पावसाळ्यात या गावांना संभाव्य महापुराबाबत सतर्क करणे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी संदेश देण्याची जबाबदारी संबंधित गावातील समितीवर सोपवावी. त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी तयार करून ती जिल्हा मुख्यालयाला कळवावी. आपत्ती काळात तत्काळ मदत व बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात ०२४५२-२२७०२,२२६४०० हे क्रमांक कार्यान्वित आहेत. १०७७ हा निःशुल्क क्रमांकही सुरू केला आहे,’’ असेही गावडे म्हणाले.

अतिवृष्टी व पुराचा गावाला वेढा पडतो. त्यामुळे पोलिस पाटील, तलाठ्यांची गावनिहाय संपूर्ण पत्ता यादी तयार करावी. पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त असल्यास ती तत्काळ दुरुस्त करून घ्यावीत. जिल्ह्यात ५२ महसूल मंडले असून, नवीन मंडलांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com