Carrot Dehydration : गाजर निर्जलीकरणाचे तंत्र

Dehydration Technology : गाजर हे बायोटिन, पोटॅशिअम आणि जीवनसत्त्वे- अ (बीटा कॅरोटीन), के १ (फायलोक्विनोन) आणि बी ६ चा चांगला स्रोत आहे.जीवनसत्त्व-अ हे दृष्टी आणि शरीर वाढ आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहे.
Carrot
Carrot Agrowon
Published on
Updated on

प्रीती भोसले

Carrot Nutrient Retention : गाजर हे बायोटिन, पोटॅशिअम आणि जीवनसत्त्वे- अ (बीटा कॅरोटीन), के १ (फायलोक्विनोन) आणि बी ६ चा चांगला स्रोत आहे.जीवनसत्त्व-अ हे दृष्टी आणि शरीर वाढ आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहे. बायोटिन हे फॅट आणि प्रथिनांच्या चयापचयात महत्त्वाची भूमिका निभावते. जीवनसत्त्व के १ रक्त गोठणे आणि शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते. पोटॅशिअम खनिज रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते. जीवनसत्त्व बी ६ अन्नाला ऊर्जेत रूपांतरित करण्यात मदत करते.

आरोग्यदायी फायदे

गाजर हे अत्यंत पौष्टिक असते, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीन असतो. गाजरांमध्ये जीवनसत्त्व बी१, बी२, बी६, आणि बी१२ यांसारख्या महत्त्वाच्या जीवनसत्त्वांसह कॅरोटीनच्या उच्च प्रमाणाची उपलब्धता असते. गाजरातील जीवनसत्त्व अ चे प्रमाण २०५५ ते ९१०० आय.यू/१००ग्रॅम पर्यंत असते. कॅरोटिनॉइड्सचे जास्त प्रमाण सेवन केल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो.

Carrot
Carrot Farming : गाजराच्या शेतीने बदलले बक्षीहिप्परगेचे अर्थकारण

जीवनसत्त्व अ हे एक प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे, जे शरीराच्या उतकांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, संसर्गाशी लढण्यास मदत करते, डोळ्यांचे आरोग्य राखते आणि फुप्फुसांच्या तसेच त्वचेतील एपिथेलियल उतकांचे पोषण करते. कॅरोटिनॉइड्सच्या उच्च प्रमाणासोबत, गाजरामध्ये आहारात तंतुमय घटक मोठ्या प्रमाणात असतात. गाजरांमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते.

निर्जलीकरण

ताजी, दर्जेदार गाजरे निवडावीत. स्वच्छ पाण्याने धुऊन सोलावीत. त्यानंतर छोटे तुकडे करावेत. कापलेल्या तुकड्यांना उकळत्या पाण्यात हलकेसे गरम करावे. त्यामुळे बुरशी आणि सूक्ष्मजीवांची वाढ थांबते. कॅबिनेट ड्रायरमध्ये गाजरातील ओलावा जाईपर्यंत ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला ६ ते ८ तासांपर्यंत सुकवावे. सुकवलेल्या गाजराच्या तुकड्यांना खोलीच्या तापमानावर थंड करावे. थंड झाल्यानंतर तुकडे पॉलिप्रॉपिलीन पाउचमध्ये पॅक करावेत. पॅक केलेले गाजराचे तुकडे सामान्य तापमानावर ६ ते ८ महिने टिकू शकतात.

Carrot
Carrot Grass : स्थलांतर करायला लावणारे गाजर गवत

विविध यंत्रे

कोल्ड रूम : गाजर किंवा इतर कच्च्या वस्तूंच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी वापर.

बबल वॉशर ः स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त. यामुळे धूळ, माती आणि इतर कचरा काढून टाकला जातो.

सोलणारे यंत्र : त्वरित आणि स्वच्छतेने सोलण्यासाठी वापरले जाते.

चिरणी यंत्र : तुकड्यांना समान आकार देण्यासाठी उपयुक्त.

ब्लांचिंग किटली : ब्लॅंचिंग प्रक्रियेसाठी गरम पाण्यात उकळण्यासाठी वापरली जाते.

ट्रॉलीसह ट्रे ड्रायर : निर्जलीकरणासाठी महत्त्वाचे यंत्र.

सीलिंग मशिन : पॅकिंगसाठी आवश्यक.

बॅच कोडिंग मशिन : उत्पादनाच्या तपशिलांसाठी कोडिंगसाठी वापर.

वजन काटा : उत्पादनांचे अचूक

वजन मोजण्यासाठी वापर.

गाजर निर्जलीकरणासाठी यंत्रणा

उपकरण क्षेत्र (फूट) क्षमता

कोल्ड रूम १२x१४x१० १०,००० किलो

बबल वॉशर ६ x ४ २०० किलो/बॅच

गाजर सोलण्याचे यंत्र ४ x ५ ५०० किलो/तास

भाजी चिरण्याचे यंत्र ४ x ३ योग्य

ब्लॅंचिंग किटली ३.५ फूट व्यास

ट्रे ड्रायर ट्रॉलीसह ८ x १० ५०० किलो/तास

सीलिंग मशीन ४ x ३ योग्य

बॅच कोडिंग मशीन योग्य योग्य

वजन काटा योग्य योग्य

इतर उपकरणे योग्य योग्य

१०० ग्रॅम कच्च्या गाजरांमधील पोषक तत्त्वे

कॅलरी ४१ कॅलरी

पाणी ८८ टक्के

प्रथिने ०.९ ग्रॅम

कार्बोहायड्रेट ९.६ ग्रॅम

साखर ४.७ ग्रॅम

तंतूमय घटक २.८ ग्रॅम

स्निग्ध पदार्थ ०.२ ग्रॅम

- प्रीती भोसले

(सहायक प्राध्यापक, अन्नतंत्र महाविद्यालय सरळगाव, जि. ठाणे) ८७६७९२०३८४,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com