मृग बहर डाळिंब बागेचे व्यवस्थापन

फळधारक बागेमध्ये महिन्याच्या सुरुवातीला फवारण्या केल्या नसतील, तर पाऊस थांबल्यावर नॅप्थील बुॲसेटिक ॲसिड (एनएए) १० पीपीएम किंवा एनएए (४.५ टक्के असलेले फॉर्म्यूलेशन) २२.५ मिलि प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
pomegranate  advisory
pomegranate advisory
Published on
Updated on

डाळिंब मृग बहराच्या बागेमध्ये दोन प्रकारे नियोजन केले जाते. त्यात

  • मे-जून बहर नियमन,
  • लेट मृग बहर - जुलै- बहर नियमन
  • अवस्था

  • फळ फुगवण
  • फुलधारणा आणि फळधारणा.
  • फळधारक बागेमध्ये महिन्याच्या सुरुवातीला फवारण्या केल्या नसतील, तर पाऊस थांबल्यावर नॅप्थील बुॲसेटिक ॲसिड (एनएए) १० पीपीएम किंवा एनएए (४.५ टक्के असलेले फॉर्म्यूलेशन) २२.५ मिलि प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. १०० टक्के फलधारणा आणि फळ फुगवण अवस्था  अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन 

  • जिबरेलिक ॲसिड ५० पीपीएम प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.
  •  ००:५२:३४ (मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट) ८.५० किलो; युरिया २२.५० किलो; आणि ००:००:५० हे १६.३० किलो प्रति हेक्टर प्रति वेळ ठिबकद्वारे ७ दिवसांच्या अंतराने ५ वेळा द्यावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची फवारणी १ ते १.५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे करावी किंवा झिंक सल्फेट ३ ग्रॅम + मॅंगेनीज सल्फेट २.५ ग्रॅम + बोरीक ॲसिड २.५ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी घ्यावी.
  • विद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट) १० ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे तीन फवारण्या कराव्यात.
  • ब) कीड व्यवस्थापन (फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी) पहिली फवारणी  सायॲन्ट्रानिलीप्रोल ०.७५ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.७५ मिलि किंवा टोलफेनपायरॉड (१५ टक्के ईसी) ०.७५ मिलि किंवा फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यूजी) ०.७५ ते १ मिलि. दुसरी फवारणी 

  • कडुनिंब तेल (१ टक्का) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मिलि किंवा पोंगामिया* (करंज बियांचे) तेल ३ मिलि किंवा वरील दोन्ही प्रत्येकी ३ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करता येईल.
  • किडींच्या प्रादुर्भावानुसार पहिल्या फवारणीमधील उर्वरित कीटकनाशके पुढील फवारण्यासाठी पर्याय म्हणून वापरता येतील. मात्र कोणतीही फवारणी एका हंगामात २ ते ३ पेक्षा अधिक वेळा घेऊ नये.
  •  फुलधारणा आणि फळधारणा अवस्था 

  • ठिबकद्वारे विद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४ (मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट) ८.५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे ७ दिवसांच्या अंतराने ३ वेळा द्यावे.
  • जिप्सम १.७ ते १.८ किलो प्रति झाड आणि मॅग्नेशिअम सल्फेट ७०० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे मातीत मिसळून जमिनीतून द्यावे. त्यानंतर पाणी द्यावे. मॅग्नेशिअम सल्फेट हे ठिबकनेही देता येते.
  • कीड व्यवस्थापन (फवारणी प्रति लिटर पाणी) रसशोषक किडींसाठी (प्रामुख्याने फुलकिडे, मावा) झाडाच्या शेंड्याच्या १५ सेंमी खाली नागमोडी पद्धतीने पिवळे किंवा निळे चिकट सापळे २५ ते ३० प्रति एकरी बांधावेत. पहिली फवारणी स्पिनेटोरम (१२ टक्के एससी) १ मिलि किंवा स्पिनोसॅड (४५ टक्के एससी) ०.५ मिलि. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनंतर) स्पिनोसॅड (४५ टक्के एससी) ०.५ मिलि किंवा नीम तेल (१ टक्का) ॲझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मिलि किंवा पोंगामिया (करंज बियांचे) तेल ३ मिलि किंवा नीम तेल + पोंगामिया (करंज बियांचे) तेल प्रत्येकी ३ मिलि. तिसरी फवारणी स्पिनोटेरम (१२ टक्के एससी) १ मिलि किंवा स्पिनोसॅड (४५ टक्के एससी) ०.५ मिलि. रोग व्यवस्थापन

  • फुलधारणेपूर्वीपासून सॅलिसिलिक ॲसिडच्या एक महिन्यांच्या अंतराने चार फवारण्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (विशेषतः तेलकट डाग रोगासाठी) करायच्या आहेत. त्यातील या महिन्यातील फवारणी ०.३ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे करून घ्यावी.
  • पावसाच्या वातावरणानुसार ७ ते १० दिवसांनी फवारणी करावी. द्रावणामध्ये स्प्रेडर स्टीकर ०.३ ते ०.५ मिलि प्रति लिटर प्रमाणे मिसळावे. नुकताच तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, (फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी)
  • बोर्डो मिश्रण ०.५ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के) २ ते २.५ ग्रॅम.
  • या व्यतिरिक्त २-ब्रोमो, २-नायट्रोप्रोपेन-१,३ डायोल (ब्रोनोपॉल ९५ टक्के) ०.५ ग्रॅम प्रति लिटर महिन्यातून एकदा फवारावे.
  • जर बागेत आधीपासूनच तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असल्यास, स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट (९० टक्के) + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड (१० टक्के) (संयुक्त अणुजीवनाशक) ०.५ ग्रॅम हे महिन्यातून एकदा आणि त्यानंतर ७ - १० दिवसांच्या अंतराने ब्रोनोपॉल फवारावे. टीप :  तेलकट डागाच्या जिवाणूमध्ये ०.५ ग्रॅम प्रति लिटर यापेक्षा कमी मात्रेला प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे शिफारशीपेक्षा कमी मात्रेने फवारणी केल्यास रोगनियंत्रणात येत नाही. फळ असलेल्या बागेत वाढीच्या अवस्थेतील फळावर तेलकट डाग रोगाचा १० ते २५ टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव असल्यास, आणीबाणीच्या वेळी ४ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या घ्याव्यात. रोगाचा प्रसार थांबल्यानंतर गरजेनुसार एकच फवारणी करावी. तेलकट डाग व्यवस्थापनासाठी आणीबाणीच्या फवारण्या (प्रमाण - फवारणी प्रति लिटर पाणी)

  • पहिली फवारणी : कॉपर हायड्रोक्साइड (५३.८ टक्के) २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट (९० टक्के) + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड (१० टक्के) (संयुक्त अणुजीवनाशक) ०.५ ग्रॅम + ब्रोनोपॉल (९५ ते ९८ टक्के) ०.५ ग्रॅम + स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि. पुढील चार दिवस कोणतीही फवारणी करू नये. दुसरी फवारणी करावी.
  • पाचव्या दिवशी दुसरी फवारणी : कार्बेंडाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट (९० टक्के) + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराइड (१० टक्के) (संयुक्त अणुजीवनाशक) ०.५ ग्रॅम + ब्रोनोपॉल (९५ ते ९८ टक्के) ०.५ ग्रॅम + स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि.
  • ( * सदर कीडनाशकास लेबल क्लेम नाही, एनआरसीची शिफारस आहे.) संपर्क ः ०२१७-२३५४३३० (हा सल्ला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथील सर्व तज्ज्ञ, शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे दिला आहे.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com