Sakal India Foundation: सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी आवाहन

Study Abroad 2025: सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळणार आहे.
Sakal India Foundation
Sakal India FoundationAgrowon
Published on
Updated on

Pune News: सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळणार आहे. देशाअंतर्गत पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या एकूण ५० शिष्यवृत्त्या मिळणार आहेत.

परदेशी विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेकडून ज्या पदवीधारक विद्यार्थ्यांना किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२५-२६) प्रवेश मिळाल्याचे लेखी पत्र प्राप्त झाले आहे, असे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील.

Sakal India Foundation
Foreign Study Tour : शेतकऱ्यांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी १ कोटी ४० लाखांच्या निधीला मान्यता

त्याचबरोबर ज्या पदवीधर विद्यार्थ्यांनकडे देशातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविल्याचे २०२३ किंवा त्या पूर्वीच्या विद्यापीठाचे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र आहे, असे विद्यार्थीदेखील या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.

बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड दोन वर्षांत किंवा त्या आधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा पीएच.डीचे शिक्षण घेणाऱ्या तसेच वरील पात्रता अट पूर्ण करणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास १० हजार रुपये इतकी रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल. सर्व पात्र विद्यार्थी फाउंडेशनच्या www.sakalindiafoundation.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी २५ जून अंतिम तारीख आहे.

Sakal India Foundation
Kharif Sowing : पारोळ्यात ३२ हजार हेक्टर क्षेत्रात कोरडवाहू पिके पेरणीची प्रतीक्षा

पोलिस पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांपासून (२००९-१०) कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्त्या सुरू केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठीही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी काही जागा या मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

तरी अशा विद्यार्थ्यांनी, ज्यांना परदेशातील विद्यापीठातील प्रवेश पत्र प्राप्त झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘केळकर शिष्यवृत्तीसाठी’ अर्ज करावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ ऑफिस बिल्डिंग, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२.

संपर्क क्रमांक : ०२० ६६०३५९३५, ई-मेल : contactus@sakalindiafoundation.org / sakalindiafoundation@esakal.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com