
Buldana News : बुलडाणा जिल्ह्यात या रब्बी हंगामात हरभरा, गहू, मका या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आलेला आहे. हरभऱ्याचे क्षेत्र दोन लाख चार हजार हेक्टरपर्यंत पोहोचलेले आहे. ही लागवड सरासरी क्षेत्राच्या १४० टक्के अधिक झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यामुळे पाणी पातळी वाढलेली आहे. शिवाय प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा असल्याने सिंचनासाठी मोठी मदत झालेली आहे.
या हंगामात शेतकऱ्यांनी रब्बीत हरभरा, गहू लागवडीला पसंती दिली. त्यातही हरभऱ्याची लागवड यावर्षी दोन लाख चार हजार ९३५ हेक्टरवर पोचली आहे. आणखी लागवड केली जात असून या क्षेत्रात भर पडण्याची शक्यता आहे.
चिखली तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४४ हजार हेक्टरपर्यंत लागवड झालेली आहे. तर सर्वात कमी क्षेत्र ३३५८ हेक्टर नांदुरा तालुक्यात आहे. यात प्रामुख्याने तालुकानिहाय विचार केल्यास जळगाव जामोद तालुक्यात ३८९५ हेक्टर, संग्रामपूर १३१८०, चिखली ४३९२७, बुलडाणा ३८७२५, देऊळगाव राजा ६२४३, मेहकर २८८८८,
सिंदखेडराजा १६५३०, लोणार १३३८८, खामगाव १२०८२, शेगाव १२७३६, मलकापूर ५७४९, मोताळा ६२३४, नांदुरा ३३५८ असे एकूण २ लाख ४९३५ हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झालेली आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी एक लाख ४६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.
गव्हाची लागवडही सरासरीपेक्षा जास्त
जिल्ह्यात गव्हाचे ५५ हजार ३९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत ५६,५३० हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यात गव्हाची सर्वांत कमी ५४८ हेक्टरवर जळगाव जामोद तालुक्यात पेरणी आहे. तर सर्वाधिक खामगाव तालुक्यात ८३५० हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. प्रकल्पावरील सिंचनासाठी यावर्षी योग्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी सुरू केलेली आहे. खरीप पीक काढून शेतकरी गहू लागवडीला पसंती देत आहेत.
मका पोहोचला १५ हजार हेक्टरपर्यंत
मका उत्पादनात बुलडाणा जिल्हा विदर्भात अव्वल समजल्या जातो. या हंगामात शेतकऱ्यांनी सुमारे १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची पेरणी केली आहे. सध्या पिकाची उगवण चांगली झालेली असून पीक जोमदार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.