Agriculture Solar Pump : नादुरुस्त सौर पपांची दुरुस्ती होत नसल्याने शेतकरी त्रस्त

Solar Pump Scheme : विजेच्या समस्येने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे विजेचा प्रश्न सुटावा आणि दिवसा वीजपुरवठा करता यावा, विजेसाठी होणारा खर्चही करता यावा यासाठी शासन मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून अनुदान सौरपंप संच बसवले जात आहेत.
Agriculture Solar Scheme
Agriculture Solar pumpAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून अनुदानावर पंपसंच बसवले जातात. मात्र ते नादुरुस्त झाल्यावर सबंधित कंपनीकडून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी त्रस्त आहेत. सौरपंप दुरुस्त होत नसल्याने पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

विजेच्या समस्येने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे विजेचा प्रश्न सुटावा आणि दिवसा वीजपुरवठा करता यावा, विजेसाठी होणारा खर्चही करता यावा यासाठी शासन मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून अनुदान सौरपंप संच बसवले जात आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासनाकडूनही मागेल त्याला सौरपंप अशा संकल्पना राबवली जात आहे.

राज्यात आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी सौरपंप संच बसवले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या १० टक्के रक्कम, तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीच्या ५ टक्के रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे.

Agriculture Solar Scheme
Agriculture Solar Pump : सौरपंप योजनेत शेतकऱ्यांची कंपनीकडून लुबाडणूक

उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. संच बसवल्यावर त्यांच्या दुरुस्तीबाबत काही वर्ष सबंधित कंपनीकडे जबाबदारी असते. मात्र एकदा संच बसवले की कंपनीकडून पुन्हा दुरुस्तीबाबत दखलच घेतली जात नाही. बंद पडलेले सौर पंप दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी मिळत नसल्याची तक्रार शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Agriculture Solar Scheme
Solar Agriculture Pump : पैसे भरूनही सोलार कृषी पंप मिळेना

याबाबत दाद कोठे मागायची याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहेत. सौरऊर्जेवर चालणारा विद्युतपंप असल्याने व अन्य पाणी उपसा करण्याबाबत साधने नसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून अनुदान सौरपंप संच बसवले नादुरुस्त झाल्यावर पुन्हा दुरुस्ती होत नसल्याने शेतकतरी त्रस्त झाले आहेत.

गेली दोन ते अडीच महिने पंप बंद असल्यामुळे शेतातील पिकांची नुकसान झालेले आहे. लवकरात लवकर सौर पंप दुरुस्त केले नाहीत तर या कंपन्या विरोधात ग्राहक मंचात नुकसानभरपाईसाठी तक्रार करणार आहे.
- सुधीर आखाडे, शेतकरी, मिरजगाव, ता. कर्जत, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com