Solar Agriculture Pump : पैसे भरूनही सोलार कृषी पंप मिळेना

Agriculture Solar Scheme : शेतकऱ्यांनी पैसे भरून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.
Agriculture Solar Scheme
Solar pumpAgrowon
Published on
Updated on

Jalna News : शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना अत्यंत संथगतीने राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.

दरम्यान, जाफराबाद तालुक्यामध्ये साडेतीन हजार शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यामध्ये वीजवितरण कंपनीकडून ११०० लोकांना अप्रूव्हल दिले असले तरी प्रत्यक्षात सौरपंप बसविण्यास विलंब होत आहे.

दरम्यान, अजूनही अडीच हजार शेतकरी मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअगोदर शेतकऱ्यांसाठी मेडा आणि कुसुम या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप दिले जात होते. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती; परंतु नवीन योजना आल्यानंतर जुन्या सर्व शेतकऱ्यांना नवीन योजनेमध्ये वर्ग केले.

यासाठी शेतकऱ्यांना सुरवातीला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर वीजवितरण कंपनीकडून पेमेंट भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मेसेज येतात. शेतकऱ्यांनी संबंधित पोर्टलवर पेमेंट केल्यानंतर विभागीय कार्यालयाकडून अप्रूव्हल दिले जाते. त्यानंतर पुन्हा लाइनमनकडून आयडी तयार करून दिला जातो. नंतर पुन्हा विभाग कार्यालयावर संबंधित अर्ज पाठविला जातो.

Agriculture Solar Scheme
Agriculture Solar Pump : सौरपंप योजनेत शेतकऱ्यांची कंपनीकडून लुबाडणूक

त्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्यांची निवड करून सौर कृषी पंप पुरविणाऱ्या कंपन्यांना कळविले जाते. मात्र, अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यंदा पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली. रब्बी लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्र वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी खोदल्या आहेत.

Agriculture Solar Scheme
Solar Pumps : केंद्र सरकार तेलंगणातील शेतकऱ्यांना १ लाख सोलर पंप देण्याची शक्यता

यामुळे मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत अनेकांनी साधारण दोन-तीन महिन्यांपूर्वी सोलार पंपासाठी अर्ज भरले होते. दरम्यान, निवडणूक काळात काही दिवस या योजनेची साइट बंद झाली होती. महावितरण पोर्टलची साइट सद्यःस्थितीत सुरू आहे. यात सोलार पंपासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याचा पर्याय आहे; परंतु पुरवठादार निवडण्याचा कोणताही पर्याय येत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

नवीन अर्जधारकांना येताहेत अडचणी

मागेल त्याला सौरपंप या योजनेसाठी सातबारा उताऱ्यावर विहिरीची आवश्यकता असते. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी अलीकडल्या काळामध्ये नवीन विहिरी खोदल्या आहेत. दरम्यान, या खोदलेल्या विहिरींचा फेर सातबारा उताऱ्यावर घेतला जात नाही.

अडीच महिन्यांपूर्वी आपण कृषी सौरपंपासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करून त्याची रकमही भरली आहे; परंतु अद्याप सौरपंप पुरवठा करणाऱ्या कंपनीची नावे निवडण्याचा पर्याय खुला नसल्याने पैसे भरूनही पंप मिळत नाही, अशी स्थिती आहे. रब्बीचे पीक सध्या वाया जात असून, शासनाने रब्बी पिकाला उपयोग होईल, अशा रितीने सौरपंप उपलब्ध करून द्यावेत.
- ज्ञानेश्वर उखर्डे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com