Vegetable Market : पावसाळी भाज्यांना चांगली मागणी

Vegetable Rate : श्रावण सुरू झाला असून पावसाळ्यात डोंगर माथा, शेताचा बांध व घराच्या परसात लागवड केलेल्या ताज्या भाज्यांची आवक वाढली आहे.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : श्रावण सुरू झाला असून पावसाळ्यात डोंगर माथा, शेताचा बांध व घराच्या परसात लागवड केलेल्या ताज्या भाज्यांची आवक वाढली आहे. नवी मुंबईतील गावागावात भरणाऱ्या बाजारात आता या भाज्या दिसू लागल्या आहेत.

या परिसरात मोजकेच आदिवासी पाडे असल्याने पनवेल व उरण भागातूनदेखील ताज्या व रासायनिक खत विरहित अशा गावरान भाज्या बाजारात दाखल होत आहेत. यंदा गावरान भाज्यांचे भावही कडाडले आहेत, त्यांचे भाव किलो मागे साठ ते दोनशे रुपयांवर पोहचले आहेत.

Vegetable Market
Vegetable Market : मागणी वाढल्याने वांगी दरात सुधारणा

श्रावण महिन्यात पावसाच्या सुरुवातीला शहरातही आदिवासी बांधव आपल्या घराच्या परसात स्थानिक भाज्यांची मशागत करतात. या ठिकाणी शिरले, काकडी, घोसाळी, दुधी भोपळे, पडवळ आदींचे पीक घेतले जाते. या भाज्या बहुतांशी सेंद्रिय व पारंपरिक पद्धतीनेच घेतल्या जातात.

भाज्यांचे भाव

शिराळे : १०० ते २०० रुपये किलो

कारली : १०० ते १५० रुपये किलो

काकडी : ५० ते ७० रुपये किलो

घोसाळी : ८० ते १५० रुपये किलो

आळु : ५० रुपये जुडी

भाजे : ७० रुपये जुडी

केवला : २० ते ४० रूपये जुडी

मिरची : ८० ते १४० रु किलो

Vegetable Market
Chakan Vegetable Market : पावसामुळे चाकणला फळभाज्यांचे दर वाढले

पावसाळी भाज्यांना चांगली मागणी

रसायनी पाताळगंगा परिसराचे मुख्यालय वासांबे, मोहोपाडा बाजारपेठेत परिसरातील पावसाळी मळ्यातील भाज्या दाखल झाल्या आहेत. या भाज्या ताज्या व स्वस्त भावाने मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी वाढली आहे. भाज्यांना भावही चांगला मिळत असल्याने भाजीविक्रेतेही समाधान व्यक्त करत आहेत.

माणिक गड आणि कर्नाळा किल्ल्याच्या डोंगर भागातील आदिवासी बांधव, शेतकरी पावसाळी डोंगर उतारावर भाज्यांची लागवड करतात. याला पावसाळी किंवा श्रावणी भाज्यांचे मळे म्हणतात. या भाज्या दीड-दोन महिन्यांनी तयारही होत असतात. त्यानंतर या भाज्या पनवेल किंवा रसायनी पाताळगंगा परिसराचे मुख्यालय वासांबे, मोहोपाडा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com