Agriculture AI: ‘एआय’ तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : दत्तात्रय गावसाने

Dattatray Gavasane: कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यास शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
Dattatray Gavasane, Divisional Joint Director of Agriculture, Pune
Dattatray Gavasane, Divisional Joint Director of Agriculture, PuneAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यास शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

हे आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले.

Dattatray Gavasane, Divisional Joint Director of Agriculture, Pune
AI Policy in Agriculture: ‘एआय’ धोरणाला पुढे नेण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालयाकडे

कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंतरावजी नाईक जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १) कृषी दिनाचे आयोजन जिल्हा परिषद येथील मा. यशवंतरावजी चव्हाण सभागृह येथे करण्यात आले होते.

Dattatray Gavasane, Divisional Joint Director of Agriculture, Pune
AI In Agriculture : शेती उत्पादकता, उत्पन्नवाढीस ‘एआय’चा वापर फायदेशीर

या वेळी दीप प्रज्वलन करून स्व. वसंतरावजी नाईक यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे फार्म मॅनेजर चंद्रकांत दाते, फार्म मॅनेजर, गटविकास अधिकारी शिवाजी नागवे आदी उपस्थित होते.

कृषी दिनानिमित्त पंचायत समिती हवेली विकास गटातील विजय एकनाथ कुंजीर (कुंजीरवाडी), दशरथ लक्ष्मण गायकवाड (वडकी), विजय सुरेश जवळकर (आळंदी म्हातोबाची), प्रियंका सुहास शिंदे (तरवडेवस्ती), आप्पासाहेब रंगनाथ काळभोर (आळंदी म्हातोबाची) या ५ पुरस्कारप्राप्त व प्रगतिशील शेतकऱ्यांना सन्मानपत्र, शॉल, श्रीफळ, रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात प्रकल्प संचालक सूरज मडके यांनी प्रास्तविक करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com