AI In Agriculture : शेती उत्पादकता, उत्पन्नवाढीस ‘एआय’चा वापर फायदेशीर

Soybean Sowing : सोयाबीनची पेरणी, लागवड तंत्र, व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विनायक सुतार म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, महाडीबीटीद्वारे या योजनांचा लाभ घेता येतो.
Ai Agriculture
Ai AgricultureAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य शासनाने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणाला मान्यता दिली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची उत्पादकता आणि उत्पन्नवाढ करून शेतीतला खर्च कमी करावा, असे मत तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी बुधवारी (ता. १८) कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे व्यक्त केले.

कृषी विभागाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान-अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके, खाद्यतेल अभियान व आरकेव्हीवायअंतर्गत देण्यात येणाऱ्या सोयाबीन बियाण्यांचे श्री. शेटे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. त्या वेळी शेटे बोलत होते.

ग्रामपंचायत सदस्य विनायक सुतार, लेबर फेडरेशनचे संचालक महादेव जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, सहायक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर गोडसे, श्रीकृष्ण शेतकरी गटाचे अध्यक्ष महेश पेंडपाले, अमोल सुतार, संजय आदाटे, बाळासाहेब माने, दिलीप कांबळे या वेळी उपस्थित होते.

श्री. शेटे म्हणाले, ‘‘कमी खर्चात, कमी कालावधीत सोयाबीन निघते, शेतकऱ्यांना त्यासाठी फारसा खर्च येत नाही. पण बीजप्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करावी. आपल्या भागात पाण्याचा खात्रीशीर स्रोत नाही. त्यामुळे पाणलोटची कामे करावीत,

Ai Agriculture
AI in Agriculture: आधुनिक शेतीसाठी मोठे गुंतवणूक धोरण : फडणवीस

आता जलतारा प्रकल्प फायदेशीर ठरत आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र १४०० हेक्टरवर आहे, त्यापैकी ३०० हेक्टरवर पाणलोटची कामे झाली आहेत. आता उर्वरित क्षेत्रावरही कामे करा, हे पाणी आपल्याच शेतात जिरणार आहे, हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.

Ai Agriculture
Maharashtra Agriculture AI Policy: शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या धोरणाला मंजुरी

या वेळी सोयाबीनची पेरणी, लागवड तंत्र, व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विनायक सुतार म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, महाडीबीटीद्वारे या योजनांचा लाभ घेता येतो. शेतकऱ्यांनी त्यासाठी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन केले. श्री. गोडसे यांनी या वेळी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सूत्रसंचालन संजय आदाटे यांनी केले. आभार दिलीप कांबळे यांनी मानले.

२५ लाभार्थींना वाटप

शेतकरी गटासाठी असणाऱ्या या बियाणाचे गावातील १० हेक्टर क्षेत्रावरील पीक प्रात्यक्षिकासाठी २५ लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर २२ किलोप्रमाणे प्रत्येकी एक पिशवी बियाण्यांचे वाटप या वेळी करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com