Widow Women
Widow WomenAgrowon

Women Self Help Group : परंपरेला फाटा देत विधवा महिलांचा सन्मान

Women Empowerment : विधवा प्रथाबंदीसाठी सामूहिक प्रार्थना केली, विधवा महिलेच्या बांगड्या फोडणार नाही, कुंकू पुसणार नाही, विधवा प्रथेला प्रत्यक्ष कृतीतून मुठ-माती देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

Pune News : कानसे (ता. आंबेगाव) येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी एकत्र येत मकर संक्रांत सणानिमित्त विधवा प्रथा बंदीचा नारा दिला.

विधवा प्रथाबंदीसाठी सामूहिक प्रार्थना केली, विधवा महिलेच्या बांगड्या फोडणार नाही, कुंकू पुसणार नाही, विधवा प्रथेला प्रत्यक्ष कृतीतून मुठ-माती देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

याप्रसंगी बचत गटांतील महिलांशी संवाद साधताना यशवर्धिनी संघाचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप म्हणाले, ‘‘विधवा महिलांबाबत जुन्या रूढी, परंपरा प्रथामध्ये बदल झाला पाहिजे.

Widow Women
Women Empowerment : घरच्या शेतीविकासासह महिलांना दिले उद्योगांचे बळ

स्त्रियांना विविध प्रथा व परंपरांच्या नावाखाली बंधने घालण्यात स्त्रियाच पुढे असतात, त्यामुळे महिलांचा आदर करण्यासाठी विधवांना सर्व कार्यक्रमात जाणीवपूर्वक समाविष्ट करून घेतले पाहिजे.

Widow Women
Women Empowerment : अल्पभूधारक महिला झाली शून्यातून प्रक्रिया उद्योजक

एखाद्या कुटुंबात पतीच्या निधनानंतर जी आई मुलांना कष्ट करत पदरमोड करून शिक्षण देत मोठे करते, त्यांच्याच लग्नकार्यात तिला औक्षण करण्याचा मानदेखील दिला जात नाही, अशा जुन्या प्रथा बंद करण्यासाठी सर्वांनी एकमताने पुढे आले पाहिजे.’’

याप्रसंगी सरपंच सविता वाळूंज, उपसरपंच अविनाश आमुंडकर, संघाच्या अध्यक्षा योगिता बोऱ्हाडे, सचिव अलका घोडेकर, संघ पदाधिकारी आशा बोऱ्हाडे, लेखापाल कल्पना एरंडे, ग्रामसेविका रूपाली देवडे, आरोग्यसेविका आम्रपाली, डिभें, उपसरपंच अर्चना डोंगरे, संघ कार्यकर्ते सुहास वाघ, सीमा कानडे, हरिभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे, शुभांगी भोसले, यांच्यासह दुर्गादेवी, मच्छिंद्रनाथ, प्रेरणा, महेश्वर, गणेश, लक्ष्मी, मुक्तादेवी, मातोश्री, तुळजाभवानी, सरस्वती, धनलक्ष्मी, कानिफनाथ, राणूबाई, संतोषीमाता बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com