Pigeon Pea Farming : तूर लागवडीसाठी वापरा सुधारित वाण

Tur Varieties: तूर हे महत्त्वाचे कडधान्य पीक असून, दीर्घ काळ शेतात राहणाऱ्या या पिकामध्ये उत्पादकता वाढीच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी योग्य जातींची निवड केल्यास अधिक फायदा होईल.
Pigeon Pea Farming
Pigeon Pea FarmingAgrowon
Published on
Updated on

संजय बडे

Tur Varieties For Cultivation : तूर हे महत्त्वाचे कडधान्य पीक असून, दीर्घ काळ शेतात राहणाऱ्या या पिकामध्ये उत्पादकता वाढीच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी योग्य जातींची निवड केल्यास अधिक फायदा होईल.तूर या पिकास मध्यम ते भारी, खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. चोपण व क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड टाळावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ इतका असावा. आम्लयुक्त जमिनीत पिकांच्या मुळावरील गाठीची वाढ होत नाही. नत्राच्या कमतरतेने रोपे पिवळी पडतात.

मशागत : तुरीची मुळे खोलवर जातात. त्यामुळे खोल नांगरटीनंतर वखराच्या दोन-तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखरपाळीच्या आधी हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.हवामान : सरासरी २१ ते २४ अंश सेल्सिअस सरासरी तापमान आणि ७०० ते १००० मि.मी. वार्षिक पर्जन्यमान असावे. पेरणीनंतर पहिल्या एक ते दीड महिन्याच्या काळात नियमित पाऊस फायदेशीर ठरतो.

Pigeon Pea Farming
Agrowon Podcast: टोमॅटो दर टिकून; तूर, भोपळा, बटाटा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

फुले व शेंगा भरण्याच्या काळात कोरडे व समशीतोष्ण हवामान योग्य ठरते. शेतात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.पेरणीची योग्य वेळ : समाधानकारक पाऊस ७५ ते १०० मिलिमीटर पडल्यानंतर वाफसा येताच तुरीची पेरणी करावी. पेरणी १५ जुलै पूर्वी संपवावी. पेरणीस १५ दिवस उशीर झाल्यास २५ ते २७ टक्के घट येते. बीज प्रक्रिया : पेरणीपूर्वी २.५ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.

जैविक घटकांमध्ये ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यानंतर रायझोबिअम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू २५० ग्रॅम (प्रत्येकी) प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून लावून बियाणे तासभर सावलीत सुकवावे. लगेच पेरणी करावी. यामुळे रोपावस्थेत जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण, नत्राचे स्थिरीकरण आणि स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होते.

Pigeon Pea Farming
Natural Wax : फळे-भाज्यांना नैसर्गिक मेणाचं जैविक कवच

पेरणी : जिरायत लागवडीकरिता दोन ओळीतील अंतर ९० सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर ३० सेंटिमीटर एवढे ठेवावे. शेतकरी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे होते. बियाणे चार ते पाच सेंटीमीटर खोल पडेल अशा प्रकारे पेरणी करावी. बागायतीसाठी एके ठिकाणी दोन ते तीन बिया टाकून ९० बाय ९० सेंटीमीटर टोकण पद्धतीने लागवड करावी. ५ ते ६ किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते.

आंतरपीक पद्धती : तुरीचे प्रचलित क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तूर+बाजरी (२:४), तूर+ज्वारी (३:३) किंवा २:४, तूर+सोयाबीन/मूग/उडीद १: २ किंवा २:४ ओळीचे प्रमाण ठेवून आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो.

खत व्यवस्थापन : पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद पेरणी बरोबर पाभरीने द्यावे. जमिनीत पालाशची कमतरता आढळल्यास हेक्टरी ३० किलो पालाश वापरावे. त्याशिवाय हेक्टरी २० ते २५ किलो गंधक जिप्समद्वारे देण्याची शिफारस केली आहे. पण स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेट स्वरूपात दिल्यास त्यातील १२.५% गंधक तूर पिकास उपयुक्त ठरते. जमिनीत जस्ताची कमतरता असल्यास पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी १५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

Pigeon Pea Farming
Illegal Fertilizer : श्रीरामपूर, राहुरीला साडेदहा लाखांचे बेकायदा खत जप्त

आंतरमशागत : तुरीचे पीक सुरुवातीच्या काळात (३० ते ४० दिवस) अतिशय सावकाश वाढते. या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त राहतो. पीक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली आणि त्यानंतर पीक ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पीक पेरणीपासून ४५ दिवसापर्यंत तणमुक्त ठेवल्यास उत्पादनात वाढ होते.

पाणी व्यवस्थापन : तूर पिकास सुरुवातीच्या काळात १५ ते २० दिवस आणि शेंगा तयार होण्याचा काळात २५ ते ३० दिवस पाण्याचा ताण पडू देऊ नये. या पिकांमध्ये कळ्या धरताना, फूल अवस्था आणि शेंगात दाणे भरणे या तीन अवस्था पाण्यासाठी संवेदनशील आहेत. या अवस्थेत ओलावा नसल्यास पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे. या पिकासाठी सरी वरंबा पद्धतीची जमीन बांधणी योग्य ठरते.

तुरीच्या वाणाची निवड करताना

कोरडवाहू क्षेत्रात तुरीच्या वाणाची निवड करताना कमी कालावधीत येणारे, अवर्षण प्रतिकारक्षम,कीड व रोगांना कमी बळी पडणारे वाण निवडावेत.जमिनीचा प्रकार, संरक्षित ओलिताची सोय, वाणाचा परिपक्वता कालावधी व मर व वांझ रोगाचा होणारा प्रादुर्भाव या सर्व बाबी लक्षात घेऊन तुरीच्या पुढीलपैकी योग्य त्या सुधारीत वाणाची निवड करावी.

Pigeon Pea Farming
Agriculture Commodity Market : हरभरा, मूग, तुरीच्या किमतीत उतरता कल

बीडीएन ७११ : दाण्याचा रंग पांढरा, कमी कालावधीत तयार होणारा वाण, तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक. पक्वता १५० ते १५५ दिवस. उत्पादन १६ ते १८ क्विंटल /हेक्टरी.गोदावरी : पांढरा दाणा, शेंग वाढीच्या अवस्थेत सिंचन आवश्यक, मर व वांझ रोगास प्रतिकारक, १६५-१७० दिवस, उत्पादन २२ ते २४ क्विंटल /हेक्टरी.फुले राजेश्वरी : मर व वांझ रोगास प्रतिकारक, तांबड्या रंगाची टपोरे दाणे. लवकर पक्वता, १४०-१५० दिवस, उत्पादन १८ ते २३ क्विंटल/ हेक्टरी

बी. एस. एम.आर.७३६ : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लाल दाणा, १७५- १८० दिवस, उत्पादन १८-२० क्विंटल/ हेक्टरी.पी. के. व्ही. तारा : दाण्याचा रंग लाल ,मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम, १७८-१८० दिवस, उत्पादन १९-२० क्विंटल/हे.बी. डी. एन. ७०८ (अमोल) : शेंगा गर्द लाल, दाणे चमकदार लाल व मध्यम आकाराचे, शेंगा पोखरणाऱ्या किडीस सहनक्षम, १६०-१६५ दिवस, उत्पादन १६-१८ क्विंटल /हेक्टर.आय. सी. पी. एल. ८७११९ (आशा) : भारी जमिनीत लागवडीस योग्य, उशिरा तयार होणारे वाण, दाण्याचा रंग लाल, मर व वांझ रोग प्रतिकारक्षम, अर्ध रब्बी तुरीच्या लागवडीसाठी शिफारशीत, १८०- २०० दिवस, उत्पादन १२-१४ क्विंटल /हेक्टर.

फुले तृप्ती : दाणे आकाराने टपोरे, दाण्याचा रंग फिक्कट तपकिरी, मर व वांझ रोगास मध्यम प्रतिकारक्षम, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा प्रादुर्भाव कमी, १६०-१७० दिवस, उत्पादन २२-२३ क्विंटल/हे.फुले पल्लवी (फुले तूर १२-१९-२) : दाणे टपोरे फिकट तपकिरी, मर व वांझ या रोगास मध्यम प्रतिकारक्षम, शेंगा पोखरणारी अळी,

शेंग माशी या किडींना कमी बळी पडणारी, मध्यम पक्वता कालावधी, १५५-१६० दिवस, उत्पादन २१.४५ क्विंटल प्रति हेक्टर.पी. डी. के. व्ही. आश्लेषा : दाणे टपोरे आणि लाल रंगाचे; मर, वांझ, करपा आणि पानावरील ठिपके या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम, जिरायत लागवडीसाठी योग्य, १७५-१८० दिवस, उत्पादन १९-२० क्विं/हे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com