Satara BDO : मी माझ्या पगारावर समाधानी आहे!

Satara Panchayat Samiti : सरकारी कार्यालय म्हटले, की वजन ठेवल्याशिवाय काम होणे तसे कठीणच! विशेषतः ग्रामीण भागात अधिकाऱ्यांना खूष करून काम करून घेण्यासाठी हात ‘ओले’ करावे लागतात.
Satara BDO
Satara BDO Agrowon
Published on
Updated on

Satara News : सरकारी कार्यालय म्हटले, की वजन ठेवल्याशिवाय काम होणे तसे कठीणच! विशेषतः ग्रामीण भागात अधिकाऱ्यांना खूष करून काम करून घेण्यासाठी हात ‘ओले’ करावे लागतात. शिवाय अशा ठिकाणी असणारा दलालांचा जथ्था शेतकऱ्यांना जितके लुटता येईल तितके लुटत असतो.

या पार्श्‍वभूमीवर सातारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या कार्यालयाबाहेर ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’, असा फलक लावून येथे भ्रष्टाचाराला थारा नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या सुखद फलकाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

या फलकावर लिहिले आहे, की मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही, तर मला खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर निवेदने, तक्रारी लेखी स्वरूपात पाठवाव्यात. यातून कामानिमित्त पंचायत समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांची कोणतीच कामे प्रलंबित राहू नयेत, त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये, हा श्री. बुद्धे यांचा हेतू आहे.

Satara BDO
Satara Dam Water Storage : सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांत ८१ टक्के पाणीसाठा

प्रशासकीय कामकाज करत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा नेहमीच पंचायत समितीशी संपर्क व संबंध येतो. शेतीशी संबंधित विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सातत्याने पंचायत समितीत येत असतात. तसेच या व्यतिरिक्त घरकुलापासून ते घर, रस्ता, पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, शाळेच्या खोल्या व इतर विकास कामांबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांशी संबंध येतो.

कधी कधी शासकीय कामानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना तालुक्यातील अनेक भागांमध्ये दौरे करावे लागतात. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. अशा वेळेला ते कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत. या काळात लोकांना त्यांच्याशी संपर्क करता येत नाही. तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून समस्या किंवा काम होईलच याची हमी नसते.

Satara BDO
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची सामान्य कर्ज मर्यादा वाढणार

हेलपाटा वाया जातो. ही गैरसोय टाळण्यासाठी व्हॉट्सॲप नंबरवर शेतकऱ्यांनी आपली निवेदने व तक्रारी पाठवून द्यावीत. म्हणजे त्यांची कामे गतीने होतील, यासाठी हा फलक लावला आहे. यातून शेतकऱ्यांत एक चांगला संदेश दिला आहे. पारदर्शक कारभार व्हावा. याच भावनेतून श्री. बुद्धे यांनी ही अभिनव संकल्पना राबवलेली आहे.

...असा आहे फलक

मी माझ्या पगारावर समाधानी आहे...

मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर निवेदने, तक्रारी लेखी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हॉट्सॲप मेसेज, नाव व गावाच्या उल्लेखासह) करावा, असे नमूद करण्यात आले आहे.

प्रशासकीय कामे गतिमान करण्याबरोबर पंचायत समितीत येत असणाऱ्या शेतकऱ्यांना वेळ, पैशाची बचत होऊन त्यांची कामे सुलभ होण्याचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना माझ्याशी थेट संपर्क करता येईल.
- सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com