Maharashtra Vidhansabha Speaker : विभानसभा अध्यक्षपदी नार्वेकरच, विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआच्या नेत्यांची फडणवीसांना गळ

Rahul Narvekar : राज्यात सध्या विशेष अधिवेशन सुरू असून विभानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे.
Rahul Narvekar
Rahul NarvekarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती सत्तेवर आली आहे. सध्या विशेष अधिवेशन सुरू असून आता विभानसभा अध्यक्ष निवडले जाणार आहेत. भाजपचे राहूल नार्वेकर यांनी आज (ता.८) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. महायुतीचे संख्याबळ पाहता त्यांची विभानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होईल. यामुळे ते दुसऱ्यांदा विभानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील. दरम्यान महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी मुख्यमत्र्यांची भेट घेतली. मविआच्या नेत्यांनी विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी केली आहे.

राज्यात एकीकडे ईव्हीएमवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधकांनी काल ईव्हीएमवरून आक्षेप घेत शपथ घेतली नव्हती. पण आज शपथ घेतली. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल करताना, काल यांनी विरोध केला पण आज शपथ का घेतली. यामुळे आता विरोधकांनी ईव्हीएमवरून तुणतुणे न वाजवता राज्य चालवण्यासाठी सरकारला मदत करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

Rahul Narvekar
Legislative Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचे ‘बहिष्कारास्त्र’

अध्यक्षपदाची निवड

दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तर अध्यक्षपदासाठी दुसरा कोणताही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे अध्यक्षपदी पुन्हा एकदा नार्वेकरच असतील हे पक्के झाले आहे.

मविआची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विधानसभेच्या अध्यक्षचा प्रश्न बिनविरोधमुळे निकाली लागला आहे. यामुळे विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळावे, अशी मागणी मविआच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, शिवसेना (उबाठा) गटाचे अंबादास दानवे यासह इतर नेते उपस्थित होते.

पण यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय सर्वांना विचारून घेऊ असे सांगितले आहे. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी संख्याबळाची गरज नसते. यामुळे उपाध्यक्ष पदाचा निर्णय होऊन ते मविआला मिळेल अशी अपेक्षा ही जाधव यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Rahul Narvekar
Sharad Pawar at Markadwadi : 'तुमच्याच गावात तुमच्यावरच जमावबंदी, हा कुठला न्याय?', शरद पवार यांचा थेट प्रशासनाला सवाल...

ईव्हीएमवरून पटोलेंचा हल्लाबोल

दरम्यान ईव्हीएमवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला ७६ लाख मते कशी काय आली? असा सवाल केला आहे. शरद पवार यांनी देखील सुरुवातीला आकडे दाखवले होते. तर सत्ताधाऱ्यांना एकूण मते कमी मिळूनही त्यांचे आमदार जास्त कसे असा प्रश्न विचारला होता. यावरन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणित उत्तर देत टीका केली होती.

तर पटोले यांनी, हा एकट्या मारकडवाडीचा विषय नसून तो प्रत्येक गावचा आहे. निवडूण आलेले सरकार जनतेच्या मनातले नाही. यामुळेच गावा गावात आता फेरमतदानाची मागणी होत आहे. तसे ठराव होत आहेत. याबाबत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यायला हवी. राज्यात दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून झाल्याचा दावा पटोले यांनी यावेळी केला आहे.

जनभावनेचा आदर करणार की नाही?

तर जनतेच्या मनात एकच प्रश्न असून आमची मते गेली कुठे असा त्यांचा सवाल आहे. ते आमची मते चोरली असा दावा करत आहेत. तर एका रात्रीत सत्ताधाऱ्यांची ७६ लाख मतं वाढली. यातच आता सगळा खेळ स्पष्ट होत आहे. तर आता पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एकवटले असून त्यांच्याकडे सरकार पाहणार की नाही? जनभावनेचा आदर करणार की नाही? देशात बेरोजगारी वाढली असून नोकऱ्या मागणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला जात आहे. तर एकदा मतदान केलं म्हणजे तुमचा अधिकार संपला असं होतं नाही. पण सरकार आता असचं वागत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com