Chandrapur DCC Bank : चंद्रपूर जिल्हा बँकेवर प्रथमच भाजपचा झेंडा

Cooperative Bank : आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या रणनीतीमुळे आणि काँग्रेसच्या काही संचालकांच्या छुप्या पाठिंब्यामुळे बँकेच्या शतकापेक्षा जास्त जुन्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली.
Chandrapur DCC Bank
Chandrapur DCC BankAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे यांची तिसऱ्यांदा, तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या रणनीतीमुळे आणि काँग्रेसच्या काही संचालकांच्या छुप्या पाठिंब्यामुळे बँकेच्या शतकापेक्षा जास्त जुन्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली.

बँकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. बँकेच्या २१ संचालकांपैकी खासदार प्रतिभा धानोरकर वगळता २० संचालक उपस्थित होते. एसआयटीच्या नोकरभरती प्रकरणाच्या चौकशीच्या दबावाखाली असलेल्या काँग्रेसच्या काही संचालकांनी रवींद्र शिंदे आणि संजय डोंगरे यांना छुपा पाठिंबा दिला. परिणामी, ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

Chandrapur DCC Bank
Cooperative Bank Scheme : ‘पीडीसीसी’ बँकेने शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या

संचालकपदाच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस खासदार धानोरकर यांच्यासोबत असलेले रवींद्र शिंदे यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे बँकेवर भाजपची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे निवडणुकीत केवळ औपचारिकता पूर्ण झाली.

अध्यक्ष शिंदे आणि उपाध्यक्ष डोंगरे यांच्या सत्कार समारंभात मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, माजी मंत्री रमेश गजबे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर आणि ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते. मात्र, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वत्र चर्चा रंगली.

Chandrapur DCC Bank
Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार

काँग्रेसमधील घरभेदी

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे विश्‍वासू संचालक रोहित बोम्मावार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांचे समर्थक विजय बावणे आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे समर्थक दामोदर मिसार यांनी निवडणुकीत आणि सत्कार समारंभात भाजपला साथ दिली. काँग्रेसच्या चार संचालकांनी छुपा पाठिंबा दिल्याने पक्षातील नेत्यांना त्यांच्याच संचालकांनी दगा दिल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे.

नेत्यांवर टीकास्त्र

आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणूक रणनीतीचा उल्लेख करताना काही नेत्यांनी सुरुवातीला साथ दिली. परंतु नंतर गद्दारी केल्याचा आरोप केला. त्यांनी खासदार धानोरकर आणि माजी मंत्री मुनगंटीवार यांचे नाव न घेता टीका केली.

आमदार भांगडिया यांनीही कॉंग्रेस नेत्यांनी सुरुवातीला साथ दिली. परंतु नंतर धोका दिल्याचा उल्लेख केला. तथापि, काँग्रेसच्या चार संचालकांनी निवडणुकीत साथ दिल्याचे आणि त्यांचा सत्कार केल्याचे भांगडिया यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com