Chandrashekhar Bawankule : भाजप सर्वच मुस्लिमांच्या विरोधात नाही ः बावनकुळे

Anti-National Elements : नागपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : भाजप मुस्लिम विरोधी नाही; तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात असल्याचे ठाम मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना मांडले.

नागपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या सर्व घटनाक्रमावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर खुलासा केला. ते म्हणाले भाजप मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. पाकिस्तानने मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणाऱ्यांना आमचा विरोध आहे.

राज्यात हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये भाऊबंदकी आहे आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसने सत्य शोधन समिती स्थापन केली. समितीने भाजप आणि पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.

Chandrashekhar Bawankule
Agriculture Electricity : वीज दिवसाआड, पिकांचे होतेय चिपाड

या सर्व पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने देशभरात ‘सौगत-ए-मोदी’ हा रमजानच्या निमित्ताने कार्यक्रम राबविणार आहे. यातून बंधुभाव,एकता, सद्भाव वाढीस लागते. सामाजिक सौहार्द वाढते. आम्ही समाजात शांतता रहावी, देश मजबूत व्हावा याचा विचार करतो, असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Agriculture Development: समतोल विकासाचा सर्वोत्तम पर्याय

‘ठाकरेंनी टिकेपेक्षा पक्ष वाढवावा’

स्टॅडअप कॉमेडियन कामरा याच्यावर झालेला हल्ला आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली त्यांची बाजू यावर बावनकुळे यांनी त्यांना पुढचे भविष्य दिसत नसल्याचा टोला लगावला. शिंदे यांच्या विरोधात जेवढा रोष निर्माण होईल त्यातून आपल्याला थोडी जागा मिळेल

यासाठी ते टीका करीत आहेत. यापेक्षा त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करावे. त्यांचा पक्ष रोज फुटत आहे. लोक सोडून जात आहेत. मोदी, शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यावर बोलण्यापेक्षा आपला कार्यकर्ता पक्ष का सोडत आहे याचा विचार त्यांनी करावा, असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com