
Solapur News : मारकडवाडी ग्रामस्थांच्या एका गटाने ईव्हीएम मशीन वर शंका घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे ठरवले. यानंतर मात्र प्रशासनाने जमावबंदी आदेश करत दडपशाही केली. यावरून रविवारी जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी येथे सभा घेत ईव्हीएम जात नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर आता भाजपकडून माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तर सभा मारकडवाडी घेतली आहे. यासाठी भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत गावात हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही गावात जाणार आहेत. यामुळे येथे राजकीय रान तापले असून गावाला पोलिस छावणीने स्वरूप आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल्यापासून ईव्हीएम मशीनच्या विरोधात शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान सोलापूरच्या माळशिरज मतदारसंघातील मारकडवाडी गावात थेट बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याचा ठराव गावातील एका गटाने घेतला. ज्यानंतर याची चर्चा आता देशभर होत आहे. तर राज्यभर बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी २९ नोव्हेंबरपासून विविध ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे सभा घेत थेट प्रशासनावर प्रश्नांचा भडीमारा करत ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्यानंतर महाविकास आघाडीविरोधात आता भाजप ईव्हीएम मशीन बाजूने उभी राहिली आहे.
तर आज मारकडवाडीत भाजपची सभा घेतली जात असून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत गावात दाखल झाले आहेत. ही सभा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केली आहे. तर आजच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही गावाला भेट देणार आहेत. यामुळे येथे दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तणाव निर्माण होण्याची शक्यता
ईव्हीएम मशीनवरून भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने आल्याने मारकडवाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी देखील शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी पराभूत आमदार राम सातपुते यांचे पोस्टर झळकले होते. तर शरद पवार गेल्यानंतर भाजप आणि राम सातपुते यांच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी गावात दोन गटात जोरदार बाचाबाची झाली होती. तर पोलिसांना हस्तक्षेप करून वाद मिटवावा लागला होता. आता गावातील त्याच चौकात सातपुते सभा घेत असून पडळकर आणि खोत भाषण करणार आहेत. यामुळे पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गावात भेट देणार असल्याने आमदार उत्तम जानकर यांनी आधीच तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभा अध्यक्ष राहुल गांधी येथून ईव्हीएम च्या विरोधात लॉन्ग मार्च काढणार आहेत. याच्या तयारीसाठी ते दुपारी तीन वाजता मारकडवाडीत येत आहेत.
याआधी पटोले यांनी, मारकडवाडीच्या मुद्द्यावरून टीका केली. मतदारांच्या मनात आपण टाकलेले मत कोणाला गेलं अशी शंका आहे. त्याच्या समाधानासाठी मारकडवाडीतील लोकांनी बॅलेटपेपरवरील मतदानासाठी मॉक पोलिंग घेण्याचा निर्धार केला होता. पण निवडणूक आयोग, पोलीस प्रशासनाच्या मदतीने सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचे म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.