Bird Flu in Andhra : आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण; शेजारील राज्यांच्या पोल्ट्रीसाठी सीमा बंद

Poultry Farms : मागील काही महिन्यात महाराष्ट्रात बर्ड फ्लूच्या प्रसार होत असल्याने पोल्ट्री उत्पादक धास्तावले होते. आता मात्र तेलंगणा शेजारील आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यात बर्ड फ्लूच्या प्रसार झपाट्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे.
Bird Flu in Andhra
Bird Flu in Andhra Agrowon
Published on
Updated on

Avian Influenza In Andhra : मागील काही महिन्यात महाराष्ट्रात बर्ड फ्लूच्या प्रसार होत असल्याने पोल्ट्री उत्पादक धास्तावले होते. आता मात्र तेलंगणा शेजारील आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यात बर्ड फ्लूच्या प्रसार झपाट्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशमधील पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काही गावांभोवती एक किलोमीटरच्या परिघात प्रवेश बंदी केली आहे.

ज्या गावांमध्ये कोंबड्याच्या मृत्यु झाले आहे, अशा गावात नमुने गोळा करण्यात आलेत. गोळा केलेली नमुने तपासणीसाठी भोपाळमधील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिस संस्थेकडे पाठवले आहेत. या संस्थेने नमुने तपासणीनंतर संबंधित नमुने बर्ड फ्ल्यूचे असल्याचे सांगितले आहेत.

Bird Flu in Andhra
Bird Flu : नांदेडमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू आजाराची लागण

बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रसारावर उपाययोजना करण्यासाठी ७२१ पथकं स्थापन करण्यात आली असून बाधित जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आंध्र प्रदेश पशुसंवर्धन विभागाने दिल्याची माहिती बिझनेसलाईन या वृत्तपत्राने दिली आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उत्पादकांना भीतीचं वातावरण पसरलं आहे. आंध्र प्रदेश राज्य सरकारने बाधित भागातील १० किलोमीटरचा परिसर निगराणीखाली ठेवला आहे. तसेच १ किलोमीटरचा परीघ प्रवेश निषिद्ध जाहीर केला आहे.

आंध्र प्रदेशमध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणा केला जातो. देशातील विविध राज्यात आंध्र प्रदेशमधून अंड्याचा पुरवठा केला जातो. परंतु बर्ड फ्लूमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आंध्र प्रदेश सरकारने खबरदारी म्हणून तेलंगणातून येणाऱ्या पोल्ट्रीच्या देवाणघेवाणीवर बंदी घातली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झालेला नाहीत. काही कोंबड्याचा मृत्यू हा हंगामी आजाराने झाला आहे. त्यामुळे ते नैसर्गिक आहे. पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन तेलंगणातील पोल्ट्री उत्पादकांच्या असोशिएशनने केलं आहे. परंतु आंध्र प्रदेश सरकारने मात्र गांभीर्याने याबाबत पावलं उचलत उपाययोजना अंमलात आणायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहन पोल्ट्री फेडरेशनकडून करण्यात आलं आहे. चिकन आणि अंडी खाणे सुरक्षित आहे. कारण चिकन आणि अंडी उच्च तापमानावर शिजवले जातात. त्यामुळे विषाणू नष्ट होतात, असंही पोल्ट्री फेडरेशनकडून सांगण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com