Poultry Biosecurity : पोल्ट्रीमधील जैवसुरक्षा

Poultry Farming : रोगाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा पोल्ट्री उत्पादकांचे नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक पद्धतींचे पालन करणे आवश्यक असते.
Poultry
PoultryAgrowon

डॉ.एम.एस.बुधे, डॉ.यू.एम.तुमलाम

Poultry Management : रोगाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा पोल्ट्री उत्पादकांचे नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक पद्धतींचे पालन करणे आवश्यक असते. निर्जंतुकीकरण आणि स्वच्छेतेसोबत जैवसुरक्षा सुरक्षेच्या पद्धती वापरून संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

या सोबतच लसीकरण आणि वेळोवेळी रक्ताचे परीक्षण आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करू शकते. अपुऱ्या जैवसुरक्षेमुळे बरेच वेळा गंभीर आजार पसरू शकतात , त्यामुळे कोंबड्यांचे विलगीकरण आणि लसीकरण गरजेचे असते.

Poultry
Poultry Farming : कुक्कुटपालनातील जैवसुरक्षेची अंमलबजावणी का ठरते महत्त्वाची?

आजाराच्या प्रसाराचे स्रोत

पोल्ट्री शेडमध्ये आजार तेथे वावरणाऱ्या लोकांमार्फत पसरू शकतो, जसे की कर्मचारी, सेवा प्रतिनिधी, वाहन चालक, लसीकरण करणारे कर्मचारी, पशुवैद्यक.

नवीन आणलेली पिल्ले, पुलेट, प्रजनन करणारे नरांच्या माध्यमातून.

दूषित आणि अयोग्यरीत्या साफ केलेला परिसर.

अंडी किंवा पिल्ले,खरेदी करताना ती आजारमुक्त स्त्रोतांकडून असल्याची पडताळणी करण्याची गरज आहे. सोबतच त्या क्षेत्रासाठी लसीकरण झाल्याची नोंद आहे का ? ते पडताळून घ्यावे.

पोल्ट्रीशेडमध्ये आजार संक्रमित अंडी किंवा कोंबड्यांपासून पसरू शकतात.

पोल्ट्रीमध्ये उंदीर, जंगली पक्षी, कीटकांचा शिरकाव झाल्यास आजाराचा प्रसार होतो.

Poultry
Poultry Farming : करार पद्धतीने केले यशस्वी कुक्कुटपालन

आजार प्रतिबंधक उपाय

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. फार्ममध्ये वापरण्यात येणाऱ्या कपडे,शूज, बूट, टोपी आणि हातमोजे वेगळे ठेवावेत.

शेड व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही पोल्ट्रीला भेट देऊ नये.

पोल्ट्री हाऊसमध्ये अपरिचित व्यक्तींना प्रवेश देऊ नये.

परिसर सोडण्यापूर्वी पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या हाताळल्यानंतर, कपडे बदलावेत. हात स्वच्छ धुवावेत.

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीने आवश्यक लागणारे बूट, डोक्यावरील कॅप परिधान करूनच पोल्ट्रीफार्ममध्ये प्रवेश करावा.

सर्व वाहनांच्या चाकांचे फार्ममध्ये प्रवेश पूर्वी निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

फार्ममधील वापरण्यात येणारी सर्व सामग्री व उपकरणे वापरण्यापूर्वी व नंतर स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्यावीत.

आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करावे. लसीकरण ही एक महत्त्वाची जैवसुरक्षा प्रक्रिया आहे. मरेक्स, न्यूकॅसल, एव्हियन संसर्गजन्य ब्राँकायटिस यासारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवावे.

कोंबड्यांवरील ताण कमी करावेत. एखाद्या कोंबडीची मरतूक झाली असेल तर त्याची विल्हेवाट योग्यरीत्या करावी. मरतूक झालेल्या कोंबडीचे योग्य प्रकारे शवविच्छेदन, सूक्ष्मजीव परीक्षण करावे.

डॉ.एम.एस.बुधे, ९९२२६१५२५८

(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com