Poultry Farming : कुक्कुटपालनातील जैवसुरक्षेची अंमलबजावणी का ठरते महत्त्वाची?

पोल्ट्री फार्ममधील फीड मिल, उबवणी केंद्र आणि फार्मच्या दैनंदिन कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करावी. उपकरणे, फार्मचे योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण करावे. ब्रीडर फार्मवर संसर्ग रोखण्यासाठी कामगार, पाहुण्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

डॉ. आर. सी. कुलकर्णी, के. वाय. देशपांडे, डॉ. आकाश मोरे

Poultry business : जैवसुरक्षा हा आजार प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. हा पोल्ट्री फार्मच्या (Poultry Farm) उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जैवसुरक्षेमध्ये विलगीकरण, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, लसीकरण आणि हवेच्या गुणवत्तेचे नियंत्रण यासारख्या उपायांचा समावेश होतो.

ज्यामुळे पोल्ट्री शेडवर आणि आसपास जिवाणू/विषाणू प्रवेशास प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यात मदत होते. यामुळे कोंबड्यामध्ये पसरणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळते.

आजार नियंत्रण आणि संरक्षणाची ही यशस्वी आणि फायदेशीर गुरुकिल्ली आहे. जैवसुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करण्यात आली आहे.

कुक्कुटपालनात आजार नियंत्रित करण्याचे मुख्य मार्ग

१.चांगली जैवसुरक्षा.

२.औषधे आणि लसीकरण यांचा योग्य व प्रभावी वापर.

.कुक्कुटपालनाचा विकास होईल अशा वातावरणाची निर्मिती.

Poultry Farming
Poultry Diseases : कोंबड्यांतील अंतःपरजीवी आजारांची ओळख

जैवसुरक्षेचे प्रकार

वैचारिक जैवसुरक्षा

१) ब्रीडर कोंबड्यांचा फार्म वर्दळीच्या रस्त्यापासून दूर असावा. जवळपास तीन किलो मीटरपर्यंतच्या अंतरावर दुसरा कुठलाही फार्म नसावा.

२) ब्रीडर फार्म, फीड मिल व अंडी उबवणी केंद्रामध्ये योग्य अंतर असावे.

३) व्यावसायिक स्तरावर अंडी देणाऱ्या (लेअर) आणि मांसल (ब्रॉयलर) कोंबड्याच्या फार्ममधील किमान अंतर १.६ किलो मीटर असावे.

संरचनात्मक जैवसुरक्षा

१) फार्म पुरेशा जागेत शास्त्रीय पद्धतीने बांधलेला असावा. फार्म हवेशीर असावा.

२) आगंतुक पाहुण्यांना आवर घालण्यासाठी फार्मच्या सभोवताली कुंपण घालावे.

३) खनिजे, जिवाणू, रासायनिक दूषितता थांबविण्यासाठी फार्मवरील पिण्याच्या पाण्याची वर्षातून किमान दोन वेळेस तपासणी करावी.

४) वाहनांच्या स्वच्छतेसाठी योग्य पाणी आणि वीजपुरवठ्यासह काँक्रीटचा टप्पा फार्मच्या प्रवेशद्वारापाशी बांधून घ्यावा.

५) फार्मवर खाद्य व औषधे साठून ठेवण्यासाठी योग्य खोली असावी.

६) वाहन व चपलामुळे सूक्ष्मजीवांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.

७) मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी.

८) वन्य पक्षी, उंदीर, घूस, कुत्रा, मांजरांचा वावर थांबवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

कार्यरत जैवसुरक्षा

१) फीड मिल, उबवणी केंद्र आणि फार्म यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करावी.

२) उपकरणे, फार्मचे योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण करावे.

३) ब्रीडर फार्मवर संसर्ग रोखण्यासाठी कामगार, पाहुण्यांचे निर्जंतुकीकरण करावे. कामकाजाच्या दृष्टीने स्वच्छ कपडे द्यावेत.

४) शक्यतोवर फार्ममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळा गणवेश, ॲप्रन द्यावा. कर्मचाऱ्यांना गमबूट देण्यात यावेत, यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

५) फार्मवर भेट देणाऱ्या पाहुण्यांची नावे आणि त्यांच्या उद्देशाची नोंद वहीत ठेवावी. शक्यतोवर बाहेरील पाहुण्यांना फार्मचे संचालन दुरून/बाहेरूनच दाखवावे.

६) मांसल कोंबड्याच्या सलग घेत असलेल्या दोन बॅचमध्ये किमान दोन आठवड्यांचा कालावधी ठेवावा.

७) मांसल कोंबड्याच्या फार्मवर शक्यतो एकदाच पिले आणावीत. त्यांची विक्री एकदाच करावी.

८) नवीन बॅच येण्यागोदर कुक्कुटगृहाचे फोर्मेलीन, चुना, पोटॅशचा वापर करून योग्य निर्जंतुकीकरण, फ्युमिगेशन करावे.

९) फार्म परिसराचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. मागील प्रत्येक निर्जंतुकीकरणाच्या तारखेची फळ्यावर नोंद असावी.

१०) कुक्कुटगृहाच्या प्रवेशद्वाराअगोदर एक उथळ हौदाप्रमाणे पायरी करून त्यात ओला चुना ठेवावा किंवा ओला चुना टाकलेली गोणी अंथरावी. आत प्रवेश करण्याअगोदर प्रत्येकाने त्यात जोडे भिजवूनच आत प्रवेश करावा.

११) फार्मवर कीटक नियंत्रणाचे उपाय राबवावेत, जेणेकरून संसर्ग टाळता येईल.

Poultry Farming
Poultry Farming : शेतकरी नियोजन : कुक्कुटपालन

१२) रोगनिदानाचा कार्यक्रम आणि लसीकरणाचे योग्य वेळापत्रक योग्यरीतीने राबवावे. त्याची नोंद ठेवावी.

१३) नियमितपणे रोगनिदान चाचण्या, मेलेल्या कोंबडीचे शव विच्छेदन करून कुक्कुटसमूहाची रोगप्रतिकारक स्थिती तपासावी, नोंद ठेवावी.

१४) रोगग्रस्त, अनुत्पादित आणि आजारी कोंबड्यांचे विलगीकरण करावे.

१५) वेळोवेळी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

संपर्क - डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ. आर. सी. कुलकर्णी ७७७६८७१८०० - (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com