Chhagan Bhujbal: भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी

Maharashtra Politics: साडेपाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी (अजित गट) नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी भुजबळांकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.
Minister Induction
Minister InductionAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची अखेर साडेपाच महिन्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळात वर्णी लागली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाची त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र मागील मंत्रिमंडळात असलेल्या छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे भुजबळ नाराज होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार झाला होता आणि त्यात समावेश न झाल्याने नाराज झालेल्या भुजबळ यांनी अधिवेशन अर्धवट सोडत नागपूर सोडले होते.

Minister Induction
Chhagan Bhujbal oath : छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; आता नाशिक जिल्ह्यात चार मंत्री

त्यानंतर त्यांनी नागपुरात शक्तिप्रदर्शन करून स्वपक्षासह महायुतीला आव्हान दिले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. जरांगे यांचे आंदोलन ऐन भरात असताना भुजबळ यांनी विरोध करत आव्हान दिले होते.

लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिले होते. मात्र, त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास विरोध करत मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यामुळे उमेदवारीचा घोळ झाल्यानंतर नाराज होऊन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.

Minister Induction
Maharashtra Politics: एकत्रीकरणाचे वारे कुणाच्या पथ्यावर?

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. तसेच भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची विनंती पक्षाकडे केली होती. मात्र, निकालानंतर त्यांनी ती मागणी मागे घेत मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

आठ दिवसांपूर्वी निर्णय

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश आठ दिवसांपूर्वी निश्चित झाला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या वेळा जुळून येत नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीदिवशी शपथविधी करावा अशी विनंती भुजबळ यांनी केल्याचे समजते. मात्र भुजबळ यांच्या शपथविधीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com