
Mumbai News : भिवंडी लोकसभा मतदार संघातील ‘जीवनवाहिनी’ असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल १४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भिवंडी-वाडा, चिंचोटी ते माणकोली, कोन ते पिंपळास रस्त्यांसह शहापूर तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
माजिवडा-वडपे बायपासच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच या महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याने भिवंडीकरांचा प्रवास जलद होणार आहे.देशातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून माजिवडा ते वडपे बायपास महामार्गाची नोंद झाली आहे.
या महामार्गावरील माणकोलीहून अंजूरफाटा, कामण, चिंचोटी मार्गावरुनही अहमदाबादकडे जाणारी हजारो वाहने धावतात. तर कोनगावहून पिंपळास-वेहळे-माणकोलीमार्गे अलिमघर रस्त्यावरून गोदामांकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक सुरू असते. तर काही वर्षांपासून भिवंडी - वाडा महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी मिळावा,
यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना यश आले असून, राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात या चार रस्त्यांच्या कामांसाठी १४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कामांना मंजुरी दिल्याबद्दल कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.
१८ कोटींची तरतूद
वाडा-भिवंडी रस्त्यांच्या डांबरीकरणाबरोबरच भागांत काँक्रिटीकरण करण्यासाठी ७० कोटी, कोन-पिंपळास रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ७ कोटी, चिंचोटी-कामण-अंजुरफाटा-माणकोली रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह रस्त्यासाठी ४८ कोटी रुपये मंजूर केले. तर शहापूरसाठी १८ कोटींची तरतूद केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.