Aquaculture : मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती

Fish Species : भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात तिलापिया मासे (शा. नाव : Oreochromis niloticus) हे उथळ पाण्याच्या तलावांमध्ये ५ ते ६ महिन्यांत परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्याने नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
Fish Species
Fish Species Agrowon
Published on
Updated on

डॉ. भूषण सानप, अमिता जैन

भाग १

Tilapia Fish Species : तिलापिया मासे हे इजिप्शियन संस्कृतीमध्ये पुनर्जन्माचे प्रतीक मानले जातात. त्यांच्यामध्ये वनस्पती प्रथिने, एकपेशीय वनस्पती, परपोषित प्लवंग, जैवपूंज (बायोफ्लॉक), जिवाणू, प्लवंग आणि तलावाच्या तळातील कुजलेल्या घटकांचे रसाळ, चवदार आणि सौम्य मांसामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता असल्याने पाण्यातील कोंबडी अशीही ओळख मिळाली आहे. तिलापिया उत्पादनात चीन हा आघाडीचा देश असून, सुमारे १२० पेक्षा जास्त देशांमध्ये तिलापियाचे संवर्धन केले जाते.

महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी अमरावती, लातूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण १३ जिल्ह्यामधील जलाशय हे बारमाही नसतात. रीतसर शासकीय परवानग्या घेऊन अशा तलावामध्ये कमी काळामध्ये वेगाने वाढणाऱ्या या माशांचे उत्पादन घेणे शक्य आहे.

प्रजाती

तिलापियाच्या ७० हून अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्याने ओरियोक्रोमिस मोझांबिकस (मोझांबिका तिलापिया), ओरियोक्रोमिस निलोटीकस (नाईल तिलापिया), ओरियोक्रोमिस झिल्ली (रेड तिलापिया) या तीनच प्रजातींचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. त्यापैकी ओ. मोझांबिकस भारतामध्ये १९५२ साली आणला गेला.

मात्र त्यांची लहान वयातच मोठ्या प्रमाणात प्रजननाच्या क्षमतेमुळे नैसर्गिक तलावात शिरकाव होऊन अन्य स्थानिक माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. म्हणून १९५९ मध्ये ‘भारतीय मत्स्य संशोधन समिती’ने या माशांच्या अनियंत्रित संवर्धनावर बंदी घातली. १९७० मध्ये नाईल तिलापिया (ओ. निलोटीकस) व १९८० मध्ये लाल तिलापिया (ओ. झिल्ली)

Fish Species
Fish Species Extinction : पाणी प्रदूषणामुळे मासळीला धोका

बांगलादेशमधून पश्चिम बंगालमार्गे आंध्र प्रदेशात व तेथून सर्व भारतभर पोहचला. मात्र कमी कालावधीमध्ये वेगाने वाढणाऱ्या संख्येमुळे त्यांच्या प्रजननाचा दर मर्यादित ठेवण्यासाठी जगभरात संशोधन झाले. त्यातून ‘संप्रेरकाद्वारे लिंग बदल तंत्र’ (Hormonal Sex reversal) अवगत झाले. एकलिंगी तिलापिया (Monosex Tilapia) संवर्धन मोठ्या प्रमाणात वाढू लागले.

त्याच प्रमाणे ‘निवड प्रजनन’ (Selective Breeding) पद्धतीने गिफ्ट तिलापिया (GIFT- Genetically Improved Farmed Tilapia) ही जात १९८० च्या दशकातच विकसित करण्यात आली. मात्र आपल्याकडे ही जात २०११ मध्ये आली. डिसेंबर २०११ मध्ये केंद्र सरकारने गिफ्ट तिलापिया माशांच्या संगोपनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली. त्या अनुषंगाने राज्य सरकारांना परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले.

मत्स्यपालनासाठी उपयुक्त वैशिष्ट्ये :

भारतीय प्रमुख कार्प १ नग/चौ.मी. च्या तुलनेत तिलापिया ५ नग/चौ.मी. संचयन करू शकतो.

वातावरणातील व पाण्यातील अत्यंत बदलांस सहज सहन करण्याची क्षमता आहे.

प्राणवायू >३ ppm तापमान ६ ते ३० अंश सेल्सिअस व पाण्यातील खारटपणा ३० टक्के पर्यंत चालू शकते.

सर्व प्रकारचे खाद्य खातो. खाद्य : वाढ गुणोत्तर १ : १.२ (तुलनेसाठी कार्पचे गुणोत्तर १ : १.५ ते १.८).

संवर्धनाचा कमी कालावधी ६ ते ७ महिने. भारतीय प्रमुख व इतर कार्प १२ ते १५ महिने संवर्धन करावे लागते..

एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात.

काट्याचे प्रमाण कमी व माशांची चव चांगली असते.

मरतुकीचे प्रमाण खूप कमी. त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो.

स्थानिक बाजारपेठ व प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्याने दरही चांगला मिळतो.

माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो.

रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे.

बारमाही पाणी उपलब्ध असल्यास एका वर्षांमध्ये कमाल तीन उत्पादन घेता येऊ शकतात.

तिलापिया प्रजातींची वैशिष्ट्ये

नाईल तिलापिया

(Oreochromis niloticus )

पाण्यातील खारटपणा सहनक्षमता २९ टक्के पर्यंत आहे.

६० सें.मी. व ३.६ किलो पर्यंत वाढ होऊ शकते.

सहा महिन्यांमध्ये ६०० ग्रॅम पर्यंत वाढ होते.

१० ते ३० अंश से. पर्यंतच्या तापमानात जगतो.

भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकते.

चित्रलदा तिलापिया

(Chitralada tilapia)

चित्रलदा प्रजातीचा सुद्धा उगम हा इजिप्तमध्ये झाला. १९६५ मध्ये थायलंड येथे प्रस्थापित झाला. त्यामुळे हा मासा थाई-चित्रलदा म्हणून प्रसिद्ध आहे.

साठवणीपासून काढणीपर्यंत ९८% जगण्याचा दर.

पाच महिन्यामध्ये ७५० ग्रॅम पर्यंत वाढ होते.

या माशांना थायलंडमधील सुधारित ‘ओ. निलोटिकस’ म्हणून ओळखतात.

Fish Species
Ornamental Fish : शोभिवंत माशांच्या संगोपनाच्या पद्धती

मोझांबिका तिलापिया/चिलापी

(Oreochromis mossambicus)

पाण्यातील खारटपणा सहनक्षमता ३० टक्के पर्यंत आहे.

४० सें.मी. व ३.२ किलो पर्यंत वाढ होऊ शकते.

सहा महिन्यामध्ये ४०० ग्रॅम पर्यंत वाढ होते.

१० ते ३० अंश से. पर्यंतच्या तापमानात जगतो.

भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकते.

रेड तिलापिया (Oreochromis zilli)

पाण्यातील खारटपणा सहनक्षमता १९ टक्के पर्यंत आहे.

४० सें.मी. व ३.२ किलो पर्यंत वाढ होऊ शकते.

सहा महिन्यामध्ये ७०० ग्रॅम पर्यंत वाढ होते.

१० ते ३० अंश से. पर्यंतच्या तापमानात जगतो .

भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकते.

समुद्री राणी माशांप्रमाणे दिसतो व बाजारात खूप मागणी मिळते

गिफ्ट तिलापिया (GIFT tilapia)

आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र (ICLARM) किंवा World fish centre येथे नाईल तिलापिया प्रजातीचे निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘जेनेटिकली इम्प्रूड फार्म तिलापिया’ या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केला.

स्थानिक माश्यांपेक्षा ११२% जास्त वाढ.

साठवणीपासून काढणीपर्यंत ७५.५% जगण्याचा दर.

डॉ. भूषण सानप,

९५०३७४६४९७/८३२९९७१५२७

(सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, प्रादेशिक कार्यालय, अमरावती)

लेखाच्या पुढील भागामध्ये या माशांचे संवर्धन कशा प्रकारे करावे, याची माहिती घेऊ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com