
Nashik News : राष्ट्रीय मधमाशी मंडळ (नवी दिल्ली), राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (आनंद, गुजरात) आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, बारामतीकडून रूनमळी (ता. साक्री, जि. धुळे) आदिवासी भागात शेतकऱ्यांना ४ ते १० मार्च या कालावधीत सात दिवस शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिकापालन या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी प्रकल्पाअंतर्गत धुळे जिल्ह्यात मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापण्याचे काम बारामतीचे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टकडून केले जात आहे.
त्या अनुषंगाने मधमाशीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख पाहुणे धुळे आत्मा प्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे होते. त्यांनी आदिवासी भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी मधुमक्षिकापालन हे उपयोगी असून, मधमाश्यांपासून मिळणारी उत्पादने यांविषयी माहिती देत उत्पादनाचे विक्रीव्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक सागर खैरनार, तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. गणेश अहिरे, दीपक भोये, वामन महिरे, खंडू माळचे यांनी आयोजन केले. मंडल कृषी अधिकारी श्री. सदगिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रांत पाटील यांसह पदाधिकारी व १५७ शेतकरी उपस्थित होते.
मधमाशी पालनावर परिपूर्ण मार्गदर्शन
बारामती कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. मिलींद जोशी यांनी मधमाश्यांच्या विविध जाती, मधमाश्यांचे परागीभवनात महत्त्व, कृत्रिमरीत्या राणी माशीची पैदास, मधमाश्यांपासून मिळणाऱ्या विविध पदार्थांचे उत्पादन तसेच मधमाश्यांचे कीड-रोग आणि शत्रू व त्यांचे व्यवस्थापन,
मधमाशी पालनासाठी योग्य जातीची निवड तसेच स्थलांतर, व्यासायिकदृष्ट्या विविध अनुदानित योजना अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प सहयोगी अल्पेश वाघ यांनी मध व इतर उत्पादनाचे देशामध्ये व देशाबाहेर मागणी, बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.